रिया चक्रवर्ती आणि बंटी सजदेह रिलेशनशिपमध्ये? या फोटोंनंतर चर्चा सुरू

| Updated on: Dec 11, 2022 | 10:56 PM

सोशल मीडियावरही रियाला सातत्याने ट्रोल केले जात होते.

रिया चक्रवर्ती आणि बंटी सजदेह रिलेशनशिपमध्ये? या फोटोंनंतर चर्चा सुरू
Follow us on

मुंबई : रिया चक्रवर्ती ही सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर प्रचंड चर्चेत आली. सुशांतच्या निधनानंतर तिच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. सोशल मीडियावरही रियाला सातत्याने ट्रोल केले जात होते. सुशांतला ड्रग्स रियाच देत असल्याचे सांगितले जात होते. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर रियाच्याविरोधात सुशांतच्या चाहत्यांनी एक मोहिम सुरू केली होती. आता रिया परत एकदा प्रचंड चर्चेत आलीये. यावेळी कारण मात्र थोडे वेगळेच आहे. सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर रियाला अनेक गोष्टींना तोंड द्यावे लागले होते.

रिया चक्रवर्ती ही बंटी सजदेह याला डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत आहेत. इतकेच नाहीतर याचे फोटोही समोर आले आहेत. रिया मागे जे घडले ते विसरून आयुष्यात आता पुढे जात आहे.

रियाचे पार्टीमधील काही फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र, सुशांतच्या चाहत्यांना ही गोष्टी अजिबातच आवडलेली दिसत नाहीये. काहीजण परत आता तिला ट्रोल करताना दिसत आहेत.

नुकताच रिया ही चित्रपट निर्माता अमृतपाल सिंह बिंद्रा यांच्या पार्टीमध्ये पोहचली होती. यावेळी रियासोबत बंटी सजदेहची बहीण सीमा सजदेह आणि तिचा भाऊ शोविकसोबत होते. ज्याचे फोटो व्हायरल होत आहेत.

विशेष म्हणजे हे सर्व एकाच गाडीमध्येसोबत आले होते. यावरून आता चर्चा रंगत आहे की, रिया आणि बंटी सजदेह यांचे रिलेशन त्याच्या घराच्यांना देखील मान्य आहे. यामुळेच रिया चक्क बंटीस सजदेह याच्या बहिणीसोबत पार्टीमध्ये पोहचली होती.

गाडीच्या मागच्या सीटवर रिया आणि सीमा बसल्या होत्या. आता हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आता या फोटोंवर चाहते विविध कमेंट करताना दिसत आहेत. काहीजण यावरून रिया हिला ट्रोल देखील करत आहेत.