मुंबई : बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाची चर्चा संपत नाही, तोच आता बॉलिवूडमधील आणखी एक जोडी, अभिनेता-दिग्दर्शक फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) यांच्या मार्चमध्ये होणार्या लग्नाबद्दल बरीच कुजबुज सुरू आहे. या जोडप्याने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नसले, तरी आता शिबानीच्या बहिणीने या लग्नाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. या लग्नाच्या तयारीत अभिनेत्री रिया चक्रवर्तीही (Rhea Chakraborty) मोठी भूमिका बजावणार आहे. कारण हे दोघे रिया चक्रवर्तीचे जवळचे मित्र आहेत आणि म्हणूनच तिला या लग्नाच्या तयारीची जबाबदारीही देण्यात आली आहे.
ज्याप्रकारे फरहान आणि शिबानीबद्दल चर्चा सुरू आहे, त्यानंतर सर्वांना जाणून घ्यायचे आहे की, हे लग्न नेमके कोणत्या तारखेला होणार आहे? अशा परिस्थितीत, बॉलिवूडलाइफच्या रिपोर्टनुसार, शिबानीची बहीण अनुषा दांडेकरने या प्रश्नावर अतिशय धक्कादायक उत्तर दिले आणि सांगितले की, मला यावर काहीही बोलायचे नाही, मला याबद्दल काहीही माहिती नाही. मला या बातमीवर भाष्य करण्याचा काहीही अधिकार नाही. मी काहीही बोलणार नाही’.
बरं अनुषाने काही सांगितलं नाही, पण सांगण्यास नकार दिला नाही. पण तिच्या शैली आणि बोलण्यातून असं वाटतंय की, विकी कौशलचा भाऊ सनी कौशल आणि कतरिनाची बहीण इसाबेल यांनीही विक्की कतरिनाच्या लग्नाआधी प्रायव्हसी जपण्यासाठी जो मार्ग अवलंबला, तोच आता अनुषा देखील अवलंबत आहे. यापूर्वी अनेक माध्यमांमध्ये मुलाखतीत, तिने अशी प्रतिक्रिया दिली होती की, तिला काहीच माहित नाही आणि त्यानंतर त्यांचे लग्न पूर्णपणे खाजगी ठेवले गेले. इतकेच नाही तर, हे लग्न मीडिया आणि सामान्य लोकांपासूनही अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत फरहान आणि शिबानीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडतोय.
शिबानी-फरहानचं लग्न मोठ्या थाटामाटात होणार असल्याचं बोललं जात होतं. बॉलिवूडचे अनेक कलाकार यात सहभागी होणार होते, पण आता रिपोर्टनुसार, या लग्नात फक्त फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र सहभागी होणार आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर खूप दिवसांपासून एकमेकांसोबत राहत आहेत आणि कोरोनामुळे त्यांच्या लग्नाला खूप उशीर झाला आहे, आता दोघांनाही हे लग्न आणखी पुढे ढकलायचे नाही.
कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?
नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!