मुंबई : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूझा (Genelia D’Souza) हे बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघंही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा अनेकदा त्यांचं प्रेम, भांडणं आणि आयुष्यातील कडू-गोड क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतात, महत्त्वाचं म्हणजे हे सगळं त्यांच्या चाहत्यांच्याही पसंतीस उतरतं. दोघंही 2012 पासून सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. दोघांनाही रुपेरी पडद्यावर बऱ्याच दिवसांपासून पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे. आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसू दिसणार आहे. हो जेनेलियाने स्वतः हा खुलासा केला आहे.
नुकतंच, रितेश आणि जिनिलिया डान्स रिअॅलिटी शो ‘सुपर डान्सर 4’ मध्ये गेस्ट जज म्हणून उपस्थित होते. या जोडप्यानं सेटवर त्यांच्या लव्हस्टोरी बद्दल प्रेक्षकांना सांगितलं, दोघं कसे जवळ आले? दोघांनी त्यांच्या लग्नाचे आणि आयुष्यातील मनोरंजक किस्से सांगितले. या शोमध्ये दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांनी एन्जॉय केली.
यामुळे रितेश आणि जिनिलियाला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता पुन्हा वाढली. स्पॉटबॉयच्या बातमीनुसार, जिनिलियाला विचारण्यात आलं की, ‘प्रेक्षक तुमच्या दोघांना एकत्र पडद्यावर कधी पाहू शकतील’. यावर जिनिलिया म्हणाली, ‘मला आशा आहे की हे लवकरच होईल. हे या वर्षाच्या अखेरीस घडू शकतं.” याआधी जिनिलियाने एकदा सांगितलं होतं की तिला स्वतः रितेशसोबत काम करायचं आहे आणि फक्त एका चांगल्या स्टोरीची वाट पाहत आहे.
माझ्या बायकोचं नाव जेनेलिया नाही…
जिनिलियाच्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखनं चाहत्यांना खास गोष्ट सांंगितली होती. गेले अनेक वर्षे आपण ‘जेनेलिया’ या नावानं रितेशच्या बायकोला ओळखतो मात्र रितेशनं एक ट्विट करत ‘माझ्या बायकोचे नाव ‘जिनिलिया’ आहे … जेनेलिया नाही.’ असं सांगितलं होतं. त्यानं जिनिलियाच्या वाढदिवशी हे ट्विट केलं होतं.
पाहा ट्विट
माझ्या बायको चे नाव ‘जिनिलिया’ आहे … जेनेलिया नाही.
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 5, 2021
जिनिलिया डिसूझाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. घरात जेनेलियाला जीनू नावाने हाक मारली जाते. तिनं प्रामुख्याने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जिनिलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत ‘पार्कर पेन’च्या जाहिरातीत झळकली होती. या जाहिरातीत तिला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यानंतर तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता. पण नंतर रितेशने जिनिलियाला प्रेमात पाडलंच आणि दोघांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांनी लग्न केले. ‘जाने तू या जाने ना’ हा जिनिलियाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो, ज्यात जेनेलियाने ‘अदिती’ची भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या