बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्यासोबत पहिल्यांदाच ‘झुंड’मध्ये (Jhund) काम केलं. या चित्रपटाला सर्व बाजूंनी सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. आमिर खान, धनुष, जितेंद्र जोशी, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव यांसारख्या कलाकारांनंतर आता अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) ट्विटरवर ‘झुंड’चं कौतुक केलं आहे. रितेशने चाहत्यांना सिनेमा हॉलमध्ये जाऊन ‘झुंड’ पाहण्याचं आवाहनही केलं आहे. रितेशने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो अमिताभ बच्चन यांच्या ‘झुंड’च्या मोठ्या पोस्टरसमोर पोझ देताना दिसत आहे. ‘अमिताभ बच्चन सर, तुम्ही चित्रपटात अप्रतिम काम केलं. तुमचं मौनच लाखो शब्द बोलतात. तुम्हा अशा भूमिकेत स्क्रीनवर पाहणं म्हणजे एक वेगळाच आनंद आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा परफेक्ट आहे. कास्टिंग टीमचं कौतुक करायला हवं’, अशा शब्दांत त्याने कौतुकाच वर्षाव केला आहे. रितेशने चित्रपटातील अजय-अतुलच्या संगीताचीही स्तुती केली आहे.
रितेश देशमुखचं ट्विट-
‘कृपया स्वत:वर उपकार करा आणि थिएटरमध्ये जाऊन झुंड हा चित्रपट बघा. नागराज मंजुळे हा देशातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो तुम्हाला रडवतो, हसवतो, वेदनांचा अनुभव देतो आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तो तुम्हाला समाजाच्या भिंतीने विभागलेल्या दोन विभिन्न भारतांचा विचार करायला भाग पाडतो,’ असं त्याने म्हटलंय.
Please do your self a favour and watch #Jhund on the big screen. @Nagrajmanjule is the bestest director in the country – he makes you cry, cheer, feel the pain, the euphoria and most importantly he makes you think of two Indias divided by a compound wall. pic.twitter.com/FUICTg39ey
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 6, 2022
. @SrBachchan Sir, you are so so awesome in the movie. Your silences speak volumes. It’s a joy seeing you on screen in this avatar. Every actor is pitch perfect, kudos to the casting team. @AjayAtulOnline have hit this one out of the park – Wakada Tikada – hit #BhushanKumar ????
— Riteish Deshmukh (@Riteishd) March 6, 2022
नागपुरातील समाजसेवक विजय बारसे यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगावर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी झोपडपट्टीतील मुलांची फुटबॉल टीम त्यांनी तयार केली. या कल्पनेत कितीही विरोधाभास असला तरी त्यांनी हा प्रयोग सत्यात उतरवला आहे. छाया कदम, किशोर कदम यांच्यासारखे कसलेले कलाकार, कलाकारांच्या नजरेतले भाव अचूक टिपणारी सुधाकर रेड्डी यांची सिनेमॅटोग्राफी आणि अजय-अतुल या जोडगोळीच्या संगीताची योग्य जोड या चित्रपटाला मिळाली आहे.
हेही वाचा:
कोण आहेत विजय बारसे? ज्यांच्यावर नागराज मंजुळेंनी बनवला ‘झुंड’ चित्रपट
सोलापुरात नागराजच्या ‘झुंड’ची जादू; 15-16 वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवलं!
‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर