मुंबई : बॉलिवूड स्टार रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्याची पत्नी जिनिलिया डिसूझावर (Genelia Deshmukh) खूप प्रेम करतो. बी-टाऊनमध्ये रितेश आणि जेनेलियाच्या प्रेमाच्या चर्चा खूप आहेत. दोघांनीही आपल्या करिअरच्या सुरुवातीला भरपूर धमाकेदार चित्रपट दिले आहेत. चित्रपटांदरम्यान, 13 वर्षांपूर्वी अभिनेता अयाज खानने जिनिलियासोबत असं काही केलं, जे रितेश देशमुख विसरलेला नाही आणि आता इतक्या वर्षानंतर त्याने ‘बदला’ घेतला.
वास्तविक, जिनिलिया डिसूजाने अयाज खानसोबत ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटात काम केलं आहे. चित्रपटातील एका दृश्यादरम्यान, अदिती (जिनिलिया डिसूजा) हिला तिचा मंगेतर सुशांत (अयाज खान) झापड मारतो. आता रितेश देशमुखने त्याच्याच शैलीत याचा बदला घेतला आहे.
अयाजने रितेशसोबत त्याचा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या वर, त्याने लिहिलं- ‘आणि जेव्हा मला वाटले की द्वेष संपला आहे’. यानंतर, रितेश देशमुख व्हिडीओमध्ये येतो आणि अयाजला एकटा शोधल्यानंतर तो खूप ठोसे मारताना दिसतो. त्यांची हाणामारी फक्त मजेमध्ये आहे, जी अयाजने त्याच्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाशी संबंधित आहे.
हा मजेदार व्हिडीओ शेअर करताना अयाजने लिहिलं – ‘द्वेष कधी थांपेल का?’ त्याने रितेश आणि जिनिलियाला हसत इमोजी शेअर करून टॅग केले आहे.
रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख अलीकडेच बिग बींच्या कौन बनेगा करोडपतीमध्ये या शोमध्ये दिसले होते. रितेश अनेक मराठी चित्रपटांसाठी काम करत आहे. त्याचबरोबर अयाज खानबद्दल सांगायचं तर, त्याने बॉलिवूड आणि टीव्ही दोन्हीमध्ये काम केलं आहे. चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ते ‘ब्लफमास्टर’, ‘हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘चश्मे बद्दूर’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत. त्याचबरोबर त्यांनी टीव्ही शो ‘दिल मिल गया’, ‘कुलवधू’, ‘परिचय’ सारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे.
जिनिलिया डिसूझाचा जन्म मुंबईतील एका कॅथलिक कुटुंबात झाला. घरात जेनेलियाला जीनू नावाने हाक मारली जाते. तिनं प्रामुख्याने हिंदी, तेलगू, कन्नड, तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जिनिलिया पहिल्यांदा अमिताभ बच्चनसोबत ‘पार्कर पेन’च्या जाहिरातीत झळकली होती. या जाहिरातीत तिला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यानंतर तिने ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटात जिनिलियासोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. याआधी जिनिलियाला रितेश फारसा आवडला नव्हता. पण नंतर रितेशने जिनिलियाला प्रेमात पाडलंच आणि दोघांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केलं, त्यानंतर त्यांनी लग्न केले. ‘जाने तू या जाने ना’ हा जिनिलियाच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक मानला जातो, ज्यात जेनेलियाने ‘अदिती’ची भूमिका साकारली होती.
संबंधित बातम्या