मुंबई : रोहित शेट्टी हा त्याच्या आगामी सर्कस या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रोहितचा हा चित्रपट 23 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये रणवीर सिंह हा मुख्य भूमिकेमध्ये आहे. इतकेच नाहीतर सर्कसमधील एका गाण्यामध्ये रणवीर आणि दीपिका पादुकोण यांची जोडी देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. रोहित शेट्टी याने स्वत: च आता चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंबर कसली आहे. रोहित आणि चित्रपटाची टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये रोहित शेट्टी, रणवीर सिंह आणि चित्रपटातील इतर कलाकार आले होते. यावेळी सेटवर यांनी फुल धमाल केली.
आज गोविंदाचा 60 वा वाढदिवस आहे. आपल्या करिअरमध्ये गोविंदाने अनेक हीट चित्रपट केले आहेत. आजही गोविंदाच्या अभिनयावर प्रेक्षक फिदा आहेत. आज गोविंदा वाढदिवस सेलिब्रेट करण्यात बिझी असतानाच एका मुलाखतीमध्ये रोहित शेट्टी याने गोविंदाबद्दल अत्यंत मोठे विधान केले आहे.
रोहित शेट्टी मुलाखतीमध्ये म्हणाला की, गोविंदाने दहा वर्षांमध्ये सतत हीट चित्रपट दिले आहेत. आजकाल एक चित्रपट हीट दिला की लोक बोलतात. मात्र, गोविंदाने सतत दहा वर्ष हीट चित्रपट दिले आहेत. गोविंदा आणि डेविड धवन यांनी एक काळ गाजवला आहे. आता रोहित शेट्टी याच्या विधानाची चर्चा रंगताना दिसत आहे.
पुढे रोहित शेट्टी म्हणाला की, गोविंदाने जेवढे केले आहे. त्या तुलनेत नक्कीच त्यांना काही मिळाले नाही. गोविंदाला त्याचा हिस्सा मिळाला नसल्याचे देखील रोहित शेट्टी म्हणाला आहे. काम करूनही हवे ते सक्सेस मिळाले नाहीये. कारण शबनम, आंखे, राजा बाबू, जोडी नंबर वन असे हीट चित्रपट गोविंदाने बाॅलिवूडला दिले आहेत. गोविंदाने आपल्या करिअरची सुरूवात ही 1986 पासून केली आहे.
सर्कस चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. हा एक काॅमेडी चित्रपट असून रणवीर सिंह या चित्रपटामध्ये महत्वाच्या भूमिकेत आहे. रोहित शेट्टी याचा कोणताही चित्रपट असो तो धमाका करतो म्हणजे करतोच.