आयेशा सय्यद, मुंबई : ‘गरिबांचा मसिहा’ अशी ओळख असलेला बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनूच्या अभिनयाइतकंच त्याच्या सामाजिक कार्याची जनमानसात चर्चा असते. लॉकडाऊनमध्ये (Lockdown) जागोजागी अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली. त्यांना घरी जाण्यासाठी बसेसची देखील त्याने सोय केली होती. त्यावेळी त्याच्या कामाचं ठिकठिकाणी कौतुक केलं झालं. आताही रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान (Russia Ukraine War) सोनूने एक विशेष कामगिरी केली आहे. याची सर्वत्र चर्चा होतेय. या विद्यार्थ्याने सोनू सूदच्या टीमशी फोनवरुन संपर्क साधला. अन् मग सोनूच्या टीमने त्याला युक्रेनमधून बाहेर पडायला मदत केली.
सुटकेचा थरार
लक्ष्मण नावाचा भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेला होता. या विद्यार्थ्याने आपल्या युक्रेनमधल्या सुटकेचा थरार सांगितला आहे. लक्ष्मणने सांगितलं की, “मी वैद्यकीय शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलो होतो. युद्ध सुरू झाल्यानंतर आमच्या विद्यापिठाने म्हटलं की हे युद्ध मागच्या आठ वर्षापासून सुरू आहे. त्यामुळे त्याला तितकंस गांभिर्याने घेण्याची गरज नाही. आम्ही विद्यापीठ बंद करणार नाही. विद्यापिठाने असं सांगितल्यावर मी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामागे अजून एक कारण होतं. ते म्हणजे विद्यापीठाचा नियम आहे की तीन दिवस गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्याला ते विद्यापीठातून काढून टाकतात. त्यामुळे मी तिथेच थांबलो. पण परिस्थिती बिघडत गेली. भारतीय दूतावासाने सांगितलं की तुम्ही जिथे असाल तिथून बाहेर पडा… अन् मी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.”
“त्या कुडकुडत्या थंडीत मी घराबाहेर पडलो. पण तितक्यात माझ्या एका मित्राने व्हीडिओ पाठवून बाहेरची परिस्थिती सांगितली. पुढे जाऊ नकोस असं तो म्हणाला. अश्या परिस्थितीत मला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. मग मी सोनू सूदच्या टीमशी फोनवरून संपर्क साधला. अन् मग सोनूच्या टीमने त्याला युक्रेनमधून बाहेर पडायला मदत केली. मी रात्री 12 वाजता माझं सामान घेऊन बाहेर पडलो. गाडीला तिरंगा लावला. अन् तिरंगा बघून कुणीही मला अडवलं नाही. अन् मी युक्रेनची सीमा ओलांडली. आणि आज मी मृत्यूच्या दाढेतून पुन्हा मायदेशी परतलो आहे. मी सोनू सूद आणि त्याच्या टीमचे आभार मानतो”, असं लक्ष्मण म्हणाला आहे.
That’s my job.
I am glad that I was able to do my bit,
Big thank you to Government of India for all the support.
Jai hind ?? https://t.co/KWhf7R4pP9— sonu sood (@SonuSood) March 2, 2022
सोनूच्या या कार्याचा सर्वत्र गौरव होतोय. त्याच्या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. “अडीअडचणीत असणाऱ्यांसाठी तू देवदूत आहेस”, असं म्हणत एकाने सोनूच्या कार्याला सलाम केला आहे.
संबंधित बातम्या