जेह-तैमूरबाबत सैफ अली खान आणि करीनाने घेतला मोठा निर्णय; पॅपराजींना कळकळीची विनंती

| Updated on: Jan 29, 2025 | 12:00 AM

सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर, त्यांच्या कुटुंबाने तैमूर आणि जेह यांच्या प्रायव्हसीसाठी पॅपराजींना विनंती केली आहे. शाळा, वाढदिवस किंवा इतर कार्यक्रमांमध्ये मुलांचे फोटो काढू नये असे आवाहन सैफ आणि करिनाकडून करण्यात आले आहे.

जेह-तैमूरबाबत सैफ अली खान आणि करीनाने घेतला मोठा निर्णय; पॅपराजींना कळकळीची विनंती
Saif Ali Khan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अभिनेता सैफ अली खान याच्यावर त्याच्या घरात घुसून एका व्यक्तीने हल्ला केला. 16 जानेवारीच्या रात्री सैफवर घरातच आरोपीने चाकूने हल्ला केला. सैफवर वार केले. त्यामुळे जखमी झालेल्या सैफला तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. या जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने तो बचावला आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यात आलं आहे. या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू आहे. या प्रकरणात रोज नवीन अपडेट येत असून आताही एक नवीन अपडेट आली आहे. हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

सैफ अली खान आणि करिनाच्या पीआर टीमने पॅपराजींना एक कळकळीची विनंती केली आहे. तैमूर आणि जेहचे फोटो घेऊ नका. तैमूर आणि जेह शाळेत जात असताना, त्यांचा वाढदिवस असेल किंवा ते एखाद्या क्रीडाप्रकारात किंवा शाळेच्या कुठल्याही अॅक्टिव्हिटीत भाग घेत असतील तर त्यांचे फोटो काढू नका, असं आवाहन या पीआर टीमने केलं आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर मुलांची सुरक्षा आणि प्रायव्हसीच्या दृष्टीने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

प्रायव्हसीचा आदर करा

मुलांच्या प्रायव्हसीचा आदर करा. तसेच जोपर्यंत सैफ आणि करिनाकडून कोणतंही आमंत्रण येत नाही किंवा सूचना येत नाही, तोपर्यंत सैफ आणि करिनाचे फोटो घेऊ नका, असंही या पीआर टीमने म्हटलं आहे. मात्र, सिनेमा इव्हेंटच्यावेळी सैफ आणि करिनाचे फोटो घेतले जाऊ शकता, असंही या टीमने म्हटलं आहे. सैफ अली खान आणि करिना हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांचे फोटो घेण्यासाठी पॅपराजी उत्सुक असतातच. पण जेह आणि तैमूरला पाहण्यासाठीही फॅन्स अत्यंत उत्सुक असतात. जेह आणि तैमूरची मोठी फॅन फॉलोइंग आहे.

सुरक्षा रोनित रॉयकडे

सैफ आणि करिनाच्या या निर्णयानंतर आता त्यांच्या सेक्युरिटीबाबत महत्त्वाची पावलं उचलली गेली आहेत. सैफच्या सेक्युरिटीची सूत्रे आता अभिनेता रोनित रॉयच्या सेक्युरिटी कंपनीकडे आहे. सैफ अली खान पाच दिवस उपचार घेतल्यानंतर घरी परतला आहे. 16 जानेवारी रोजी त्याच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर त्यांचं कुटुंब हाय अलर्टवर आलं होतं. रोनित रॉय Ace Security and Protection एजन्सीचा मालक आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, करण जोहर आदी कलाकारांना रोनितकडून सुरक्षा पुरवली जाते.