2 मार्चला रात्री 2 वाजता काय घडलं? अखेर सैफ अली खान याने सांगितली संपूर्ण हकीकत, अभिनेता भडकला पापाराझींवर

| Updated on: Mar 04, 2023 | 8:09 PM

गेल्या दोन दिवसांपासून सैफ अली खान हा प्रचंड चर्चेत आहे. त्याचे कारणही तेवढेच मोठे असून 20 पापाराझी हे रात्रीच्या वेळी सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसल्याचे सांगण्यात येतंय. या प्रकरणावर आता अभिनेत्याने मोठा खुलासा केलाय.

2 मार्चला रात्री 2 वाजता काय घडलं? अखेर सैफ अली खान याने सांगितली संपूर्ण हकीकत, अभिनेता भडकला पापाराझींवर
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. या व्हिडीओमध्ये अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि त्याची पत्नी करीना कपूर दिसले. यावेळी नेहमी कूल राहणारा सैफ अली खान हा चक्क पापाराझींवर भडकलेला दिसला. इतकेच नाहीतर तो थेट पापाराझींना (Paparazzi) म्हणाला की, एक काम करा…आमच्या बेडरूममध्ये या…यानंतर अनेक चर्चा रंगल्या. यादरम्यान असेही कळाले की, सैफ अली खान हा पापाराझींवर कायदेशीर कारवाई करणार आहे. 2 मार्चला 20 पापाराझी है सैफ अली खान याच्या प्रॉपर्टीमध्ये घुसले. इतकेच नाहीतर या प्रकरणानंतर सैफ अली खान हा त्याच्या कर्मचाऱ्यांना देखील नोकरीवरून काढणार असल्याचे सांगितले जात होते.

आता या सर्व प्रकरणावर सैफ अली खान याने स्पष्टीकरण दिले आहे आणि थेट पापाराझींना इशारा देत त्यांनी सीमा ओलांडली असल्याचे देखील म्हटले आहे. सैफ अली खान याने म्हटले की, 2 मार्चच्या रात्री 2 वाजता 20 पापाराझी त्याच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये घुसले. पुढे सैफ अली खान म्हणाला की, मी माझ्या कोणत्याच कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार नाहीये. कारण घडलेल्या प्रकारामध्ये त्यांची अजिबात चुकी नाहीये.

इतकेच नाहीतर पुढे सैफ अली खान म्हणाला की, मी कोणावरही कायदेशीर कारवाई करणार नाहीये. रात्री 2 वाजता 20 पापाराझी कॅमेरा आणि लाईट घेऊन आमच्या घरात घुसले. त्यांचे हे वागणे अतिशय चुकीचे नक्कीच आहे. कारण असे रात्री कोणाच्याही घरात तुम्ही नाही घुसू शकत. त्यांनी पूर्ण मर्यादा ओलांडली आहे. प्रत्येकाने आपापल्या मर्यादेत राहावे.

आम्ही कायमच पापाराझींचा सन्मान करतो आणि समजतो. घराबाहेर, गेटच्या बाहेर ठिक आहे हे सर्व. पण यांनी मर्यादा ओलांडली आहे. आता हे स्पष्ट झाले आहे की, पापाराझींवर सैफ अली खान कोणतीही कायदेशीर कारवाई करणार नाहीये. मात्र, त्याला पापाराझींचे वागणे अजिबात पटले नसल्याचे दिसत आहे.

सैफ अली खान हा आदिपुरुष या चित्रपटामध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिपुरुष हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहताना दिसत आहेत. मात्र, या चित्रपटातील सैफ अली खान याचा लूक पुढे आल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. इतकेच नाहीतर काहींनी सैफ अली खान याच्या लूकनंतर टिकाही करण्यास सुरूवात केली होती.