मुंबई : ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण सलमान खानच्या (Salman khan) प्रत्येक चाहत्याला आज पटली आहे. एक दिवसापूर्वी साप चावल्यानंतर सलमानला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा सर्वांचे श्वास रोखले गेले, पण या मोठ्या अपघातालाही सलमानने पराभूत केले. सलमान आता बरा आहे आणि त्याने त्याचा 56वा वाढदिवस त्याचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या साथीने पनवेल फार्महाऊसमध्ये भव्य पद्धतीने साजरा केला.
सलमानच्या पनवेल फार्महाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही व्हिडीओ अभिनेत्याच्या फॅन पेजवर व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये सलमान खान त्याची छोटी भाची आयतसोबत केक कापताना दिसत आहे. कारण 27 डिसेंबरला त्याची भाची आयत हीचा वाढदिवसही सलमान खानसोबत साजरा केला जातो.
व्हिडीओमध्ये सलमान खान काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान करून, केक कापताना खूप आनंदी दिसत आहे. सलमानने आयताला उचलून घेतले आहे आणि दुसऱ्या हाताने तो केक कापत कापत आहे. सलमानसोबत आयुष शर्मा, अर्पिता खानही दिसत आहेत. सलमानच्या बर्थडे पार्टीमध्ये अरबाज खान, संगीता बिजलानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत.
दरवर्षी सलमान खान त्याचा वाढदिवस पनवेल फार्म हाऊसवर त्याचे कुटुंब आणि मित्रांसोबत साजरा करतो. यावेळीही त्याने तसेच केले. सलमानने फार्म हाऊसच्या बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला आणि साप चावल्याची संपूर्ण घटना सांगितली. तसेच, त्याच्या तब्येतीची माहिती दिली.
एएनआयशी बोलताना सलमान खानने सांगितले की, माझ्या खोलीत एक साप आला होता, जो पाहून मुले घाबरली, म्हणून मी त्याला काठीने बाहेर काढत होतो. त्यावेळी काठीचा आधार घेऊन तो माझ्या हातापर्यंत वर आला होता. त्यानंतर मी त्याला सोडता यावे, म्हणून दुसऱ्या हाताने त्याला पकडले. आमच्या कर्मचार्यांनी जेव्हा साप पाहिला तेव्हा त्यांना वाटले की, तो विषारी आहे, त्यानंतर त्यांनी जे केले, त्यामुळे सापाने मला एकदा नव्हे तर तीनदा चावा घेतला.
शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर सलमानला तातडीने एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून रविवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सलमानने पुढे सांगितले की, ‘त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्या सापाला देखील आम्ही सोबत घेऊन गेलो होतो, तिथे आम्हाला समजले की, तो विषारी नाही. तरीही मी 6 तास हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि मला अँटी व्हेनमचे इंजेक्शन देण्यात आले. मी आता पूर्ण ठीक आहे.’
Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!