Salman Khan | आमिर खान याच्यासाठी सलमान खान याने केला मोठा त्याग, चाहते हैराण, थेट…

| Updated on: Apr 23, 2023 | 3:01 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सलमान खान याचा नुकताच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि आमिर खान यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत, हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

Salman Khan | आमिर खान याच्यासाठी सलमान खान याने केला मोठा त्याग, चाहते हैराण, थेट...
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच नुकताच किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट रिलीज झालाय. काल मुंबईमधील सलमान खान याच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे सलमान खान हा देखील चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर आला. सलमान खान (Salman Khan) याला पाहून चाहत्यांनी एकच गोंधळ केला होता. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या दबंग खान अर्थात सलमान खान याला जीवे मारण्याच्या सतत धमक्या या दिल्या जात आहेत. यामुळे सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आलीये. सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर मुंबई (Mumbai) पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केलीये.

सध्या सलमान खान याचे काही फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खान याचे हे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. कारण या फोटोमध्ये सलमान खान याचे लकी ब्रेसलेट हे दिसत नाहीये. इतकेच नाही तर सलमान खान याने हे ब्रेसलेट कोणाला दिले याची देखील चर्चा रंगताना दिसत आहे.

सलमान खान याचे लकी ब्रेसलेट हे त्याने आमिर खान याला दिल्याच्या चर्चा आहेत. विशेष म्हणजे सलमान खान याचे हे ब्रेसलेट आमिर खान याच्या हातामध्ये देखील दिसले आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर खान याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून आमिर खान हा कोणत्याही पार्टींमध्येही सहभागी होत नाहीये.

आमिर खान याच्या या वाईट काळामध्ये सलमान खान हा त्याला सपोर्ट करताना दिसत असून आपले लकी ब्रेसलेट हे सलमान खान याने आमिर खान याला दिल्याची चर्चा आहे. सलमान खान याने हे ब्रेसलेट आमिर खान याला नेमके का दिले हे प्रश्न चाहते त्याला सोशल मीडियावर विचारताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याच्या हातामध्ये हे ब्रेसलेट नाहीये.

सलमान खान याचा नुकताच रिलीज झालेला किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने ओपनिंग डेला 15.81 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे केले आहे. श्वेता तिवारी हिची लेक पलक तिवारी आणि बिग बाॅस फेम शहनाज गिल यांनी या चित्रपटातू बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खान याच्या या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. निर्मात्यांना देखील या चित्रपटाकडून जास्त अपेक्षा आहेत.