मुंबई : बिग बॉसचे 16 (Bigg boss 16) वे सीजन चांगलेच रंगात आले आहे. मात्र, बिग बॉस आणि सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी पुढे येतंय. पुढील काही दिवस सलमान खान बिग बॉस 16 ला होस्ट करताना दिसणार नाहीये. सुरूवातीला बातमी अशी होती की, फक्त एक विकेंड का वार करण जोहर होस्ट करणार आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस करण जोहरच (Karan Johar) बिग बॉस 16 चे सीजन होस्ट करणार आहे. पुढील काही दिवस सलमान खान बिग बॉसमध्ये दिसणार नाहीये.
सलमान खान बिग बॉसचा विकेंडचा वार होस्ट करणार नसल्याने सलमानच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळतंय. तसेच सलमान खान बिग बाॅस पुढील काही दिवस का होस्ट करणार नाही हा महत्वाचा प्रश्न त्याचा चाहत्यांना पडलाय. मात्र, तब्येतीमुळे सलमान बिग बाॅसमध्ये घरातील सदस्यांचा क्लास घेताना दिसणार नाहीये.
रिपोर्टनुसार सलमान खानला डेंग्यूची लागण झाल्याने तो उपचार घेतोय. यामुळे सलमान खान पुढील काही दिवस बिग बाॅसच्या घरात दिसणार नाहीये. सलमान खानऐवजी करण जोहर शोला होस्ट करणार आहे. करण जोहरने बिग बाॅस ओटीटीला होस्ट यापूर्वी केले आहे. सलमान खानला डेंग्यू झाल्याच्या बातमीपासून चाहते त्याचा चांगल्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत.
अनेकजण फक्त आणि फक्त सलमान खानसाठीच बिग बाॅस बघतात. मात्र, आता पुढील काही दिवस सलमान खान बिग बाॅसमध्ये दिसणार नसल्याने याचा परिणाम बिग बाॅसच्या टीआरपीवर नक्कीच पडणार आहे. करण जोहर आता बिग बाॅसच्या घरात काय धमाका करतो हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे.