मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा सलमान खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. सलमान खान याचे चाहते त्याच्या चित्रपटाची (Movie) गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहताना दिसत आहेत. सलमान खान याच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप जास्त अपेक्षा नक्कीच आहेत. सलमान खान याचा हा चित्रपट याच वर्षी ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शाहरूख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली.
पठाण हा अडचणीमध्ये असताना त्याला वाचवण्यासाठी सलमान खान हा धावून आल्याचे चित्रपटात दाखवण्यात आले. विशेष म्हणजे प्रेक्षकांनाही ही जोडी प्रचंड आवडली. किसी का भाई किसी की जान या सलमान खान याच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये क्रेझ बघायला मिळत आहे. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करणार असल्याचे सांगितले जात आहे.
शाहरूख खान याचा पठाण चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला. तब्बल चार वर्षांनंतर शाहरूख खान हा मोठ्या पडद्यावर दिसला. झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून शाहरूख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. पठाण हा चित्रपट हिट ठरला. शाहरूख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हा ठरला आहे.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटासाठी सलमान खान देखील शाहरूख खान याने वापरलेली ट्रिक फाॅलो करताना दिसत आहे. पठाण चित्रपटातील देखील दोन गाणे सर्वात अगोदर रिलीज करण्यात आले होते आणि नंतर चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. आता सलमान खान देखील हे फाॅलो करताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी किसी का भाई किसी की जान हा चित्रपटातील दोन गाणे रिलीज करण्यात आले आहेत. सलमान खान देखील शाहरूख खान याच्या ट्रिक फाॅलो करत आहे. आता सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना प्रचंड अपेक्षा नक्कीच आहेत.
सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या माध्यमातून शहनाज गिल ही देखील बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. बिग बाॅसमध्ये खरी ओळख ही शहनाज गिल हिला मिळालीये. किसी का भाई किसी की जान या चित्रपटात श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शहनाज गिल या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे.