मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सर्वांचा आवडता अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खान याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट (Movie) 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. या चित्रपटातील अनेक गाणे आतापर्यंत रिलीज झाले असून सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे सलमान खान हा किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो हा शेअर करण्यात आलायं. या प्रोमोमध्ये कपिल शर्मा याच्या शोमध्ये किसी का भाई किसी की जान चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सलमान खान पोहचला आहे.
कपिल शर्मा याच्या शोमध्ये सलमान खान हा फुल मस्ती करताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये कपिल शर्मा हा सलमान खान याला जान शब्दाबद्दल विचारताना दिसतोय. कपिल शर्मा सलमान खान याला म्हणतो की, भाई तुझ्या आयुष्यात जान कोण आहे? यावर सलमान खान हा अत्यंत मोठे भाष्य करताना दिसतोय.
सलमान खान म्हणतो की, कोणालाही अधिकार अजिबात देऊ नका जान म्हणण्याचा. जानपासून सुरूवात होते आणि मग तुमचा जीव घेतला जातो. पहिल्यांदा मुली म्हणतात की, मी तुझ्यासोबत खूप जास्त खुश आहे…मी हे शब्दामध्ये सांगू शकत नाही. मग थोडासा वेळ जातो आणि मग हे सर्व आय लव्ह यूवर येते…मग त्यांना कळते की हा आता फसला आहे.
पुढे सलमान खान म्हणतो की, मग त्यानंतर तुमचे आयुष्य उध्वस्त होते. पुढे सलमान खान म्हणतो जान हा अर्धा शब्द असून जान लूंगी तेरी हा पूर्ण आहे, त्यानंतर पुढे अजून कोणाला जान बनवेल आणि त्याचीही जान घेईल. आता सलमान खान याचे हे बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसलाय. सलमान खान याने हा टोमणा नेमका कोणाला मारलाय, यावर जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
अनेकांनी म्हटले आहे की, सलमान खान याने हा टोमणा ऐश्वर्या राय हिला मारला आहे. मात्र, हे सर्व बोलताना सलमान खान हा हसताना देखील दिसलाय. आता सलमान खान याचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. सलमान खान याचे हे बोलणे ऐकल्यानंतर सर्वांना ऐश्वर्या राय ची आठवण आलीये. सलमान खान याच्या या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.