मुंबई : बाॅलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. शाहरूख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक चाहत्यांना बघायला मिळाली होती. या चित्रपटात पठाण ज्यावेळी अडचणीत होता, त्यावेळी त्याच्या मदतीला सलमान खान हा धावून गेला असे दाखवण्यात आले. सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. विशेष म्हणजे किसी का भाई किसी की जान हा सलमान खान याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.
सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाकडून चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत. सलमान खान याच्या या चित्रपटात बिग बाॅस फेम शहनाज गिल ही देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. किसी का भाई किसी की जान चित्रपटातील अनेक गाणे आतापर्यंत रिलीज झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वांनाच सलमान खान याचा लूक प्रचंड आवडलाय.
श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील किसी का भाई किसी की जान या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. नुकताच सलमान खान हा एका पुरस्कार सोहळ्यामध्ये पोहचला होता. यावेळी सलमान खान याने पहिल्यांदाच बाॅलिवूडच्या फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांवर उघडपणे मोठे भाष्य केले आहे. यामुळे सध्या सलमान खान हा प्रचंड चर्चेत आहे.
सलमान खान याने बाॅलिवूडच्या फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांवर भाष्य करून एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे. सलमान खान म्हणाला की, मी बऱ्याच दिवसांपासून ऐकत आलो आहे की आपले बॉलिवूड चित्रपट चालत नाहीत. बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहे. पण जर खराब चित्रपट काढले तर ते कसे चालणार ना…
सलमान खान पुढे म्हणाला, शोले आणि मुघल ए आझम आणि हम आपके है कौन बनवत आहोत, असे प्रत्येकाच्या मनात आहे, पण तसे होत नाहीये. कारण आजचे दिग्दर्शक हे कुलाब्यापासून अंधेरीपर्यंतच्या भागालाच संपूर्ण भारत समजतात. मुळात म्हणजे मी त्यांचे नाव घेऊ शकतो पण मला घ्यायचे नाहीये. एकप्रकारे सलमान खान याने बाॅलिवूडलाच खरचा आहेर दिला आहे.