मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या त्याच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना बाॅक्स आॅफिसवर दिसत आहे. मात्र, सलमान खान (Salman Khan) याचे चित्रपट जेवढ्या प्रमाणात बाॅक्स आॅफिसवर जलवा करतात, त्याप्रमाणात किसी का भाई किसी की जान चित्रपटाला जलवा करण्यात यश मिळाले नाहीये. सलमान खान याच्या या चित्रपटातून श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी आणि बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल यांनी बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. शहनाज गिल हिचा अभिनय प्रेक्षकांना आवडलाय.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला होता. सलमान खान याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सलमान खान याने काही मोठे खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे बऱ्याच काळानंतर सलमान खान हा एखाद्या मुलाखतीमध्ये आपल्या पर्सनल लाईफबद्दल उघडपणे बोलताना दिसला आहे.
सलमान खान याने नुकताच इंडिया टिव्हीला एका मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये सलमान खान थेट म्हणाला की, मला लहान मुले प्रचंड आवडतात आणि मला बाप होण्याची खूप जास्त इच्छा आहे. मात्र, त्यासाठी भारतामधील लाॅ परवानगी देत नाही. कारण मुले म्हटले की, त्यांची आई देखील आलीच की…
सलमान खान हा पुढे म्हणाला, आता काय सांगू, माझा तो अगोदरचा प्लान होता. सुनेचा नाही तर लेकऱ्यांचा होता. मात्र, आता तो भारताच्या कायद्यानुसार अजिबात होऊ शकत नाही, त्यामुळे आता काय करणार ना…मी करण जोहरसारखेच करण्याचे ठरवले होते, मात्र, आता त्या कायद्यामध्ये मोठा बदल झाला आहे. त्यामुळे हे सर्व करणे शक्य नाहीये.
मुळात म्हणजे मला लहान मुले खूप जास्त आवडतात. मात्र, जेंव्हा मुले येतात, तेंव्हा त्यांची आई देखील येते. आई त्यांच्यासाठी चांगली असते. आमच्या घरात आईंची संख्या खूप जास्त आहे. आमच्याकडे संपूर्ण जिल्हा, संपूर्ण गाव आहे, ती त्याची चांगली काळजी घेईल, परंतु त्याची आई, जी खरी आई असेल, ती माझी पत्नी असेल. सलमान खान हा पहिल्यांदाच मुलांबाबत उघडपणे बोलला आहे. सलमान खान हा कायमच चर्चेत राहणारा बाॅलिवूड अभिनेता आहे.