मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे, तरीही विकी आणि कतरिनाच्या बाजूने अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विकी कौशलच्या आईने कतरिनासाठी दिवाळीची भेट पाठवली होती. विकीच्या आईने डार्क चॉकलेट, काही दागिने आणि एक पारंपारिक साडी कतरिनाला भेट दिली.
ई-टाईम्सच्या वृत्तानुसार, बॉलिवूडचे हे लव्हबर्ड्स येत्या डिसेंबर महिन्यात राजस्थानमध्ये लग्न करू शकतात. या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी त्यांचे व्यावसायिक काम देखील थांबवले आहे. बॉलिवूड लाईफच्या वृत्तानुसार ‘दबंग’ सलमान खानने (Salman Khan) कतरिना कैफच्या लग्नामुळे ‘टायगर 3’चे (Tiger 3) शूटिंग देखील पुढे ढकलले आहे. या चित्रपटाचे शूट जानेवारीमध्ये पुन्हा शेड्यूल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सलमान खानने त्याचा जवळचा मित्र शाहरुख खानला मदतीचा हात पुढे केला आहे. या दोन्ही दिग्गजांना नुकतेच त्यांच्या आगामी ‘टायगर 3’ आणि ‘पठाण’ या चित्रपटांचे शूटिंग करायचे होते. पण रिपोर्टनुसार, शाहरुख खानला त्याचा मुलगा आर्यन खानसोबत काही वेळ घालवायचा आहे, ज्याची नुकतीच जामिनावर सुटका झाली आहे. किंग खान सध्या ब्रेकवर असून सलमानने त्याच्या चित्रपटाचे वेळापत्रक जानेवारीपर्यंत पुढे ढकलले आहे.
अभिनेता सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ‘अंतिम’ हा मराठी ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात सलमानचा मेव्हणा आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. महेश मांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘अंतिम’ हा चित्रपट 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सलमानचा जॉन अब्राहम स्टारर ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना त्यांच्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. एकेकाळी या दोन्ही कलाकारांमध्ये खूप मतभेद देखील झाले होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना आणि विकीच्या रिलेशनशिपच्या बातम्या गेल्या एक वर्षापासून चर्चेत होत्या, लॉकडाऊन दरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते. दोघेही अनेकदा पार्टीत एकत्र दिसले. अलीकडेच विकी आणि कतरिना आरती शेट्टीच्या दिवाळी पार्टीत एकत्र दिसले होते.
हाऊ रोमँटिक! भावी पत्नी पत्रलेखाला लग्नाच्या दिवशी ‘हे’ खास गिफ्ट देऊ इच्छितो राजकुमार राव!