मुंबई : सैफ अली खान याची लेक सारा अली खान नेहमीच चर्चांमध्ये असते. गेल्या काही दिवसांपासून सारा तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. सारा आता शुभमन गिल याला डेट करत असल्याचे बोलले जातंय. विशेष म्हणजे शुभमन आणि सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा विमानामधील एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सारा अली खान हिचे नाव शुभमन गिल याच्यासोबत जोडले जात आहे. मात्र, यावर सारा अली खान किंवा शुभमन गिल यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये. कार्तिक आर्यन याच्यासोबत देखील काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिचे नाव जोडले जात होते. विशेष म्हणजे यांचे काही फोटोही व्हायरल झाले.
सारा अली खान हिने तिच्या आतापर्यंतच्या बाॅलिवूड करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या आहे. मात्र, साराने काही हिट चित्रपट दिले असून तिचे काही चित्रपट फ्लाॅप देखील गेले आहेत. मात्र, सारा अली खान कधीच फ्लाॅप गेलेल्या चित्रपटांवर भाष्य करताना दिसली नाहीये. आता सारा अली खान हिने फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांवर मोठे भाष्य केले आहे.
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बोलताना सारा अली खान म्हणाली की, मला जाणीव करून दिली की मला फक्त पुढे जात राहायचे आहे, माझ्याकडून झालेल्या चुका स्वीकारायच्या आहेत, मी केलेल्या चुकांमधून शिकायचे आहे…म्हणजेच फ्लाॅप गेलेल्या चित्रपटांमध्ये ज्या चुका झाल्या आहेत, त्या सारा अली खान हिने स्वीकारल्या आहेत आणि चुका सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सारा अली खान हिचे लव आज कल 2 आणि कुली नंबर 1 हे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. कुली नंबर 1 या चित्रपटाकडून तर प्रचंड अपेक्षा या सुरूवातीपासूनच चाहत्यांना होत्या. मात्र, रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट फ्लाॅप गेला. सारा अली खान लवकरच गॅसलाइट या चित्रपटामध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे सध्या साराकडे अनेक चित्रपटांच्या आॅफर आहेत.
मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जाताना दिसत आहेत. यामध्ये मोठ्या स्टारच्या देखील चित्रपटांचा समावेश आहे. अक्षय कुमार याचे तर एका मागून एक असे तब्बल पाच चित्रपट फ्लाॅप गेले आहे. आमिर खान याचा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून तो मोठ्या पडद्यापासून दूर गेलाय. बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात फक्त पठाण चित्रपटाला यश मिळाले आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले आहेत.