मुंबई : सतीश कौशिक यांच्या निधनामुळे संपूर्ण बाॅलिवूडमध्ये शोककळा पसरलीये. सकाळपासूनच बाॅलिवूड स्टार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतीश कौशिक (Satish Kaushik) यांना श्रद्धांजली वाहताना दिसले. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये आयोजित केलेल्या होळी पार्टीमध्ये सतीश कौशिक यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर कुटुंबियांसोबत होळीचे सेलिब्रेशन करण्यासाठी सतीश कौशिक हे दिल्ली येथे पोहचले. मात्र, यादरम्यान सतीश कौशिक यांना हृदयविकाराचा झटका आला. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी येताच चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण बघायला मिळाले. सायंकाळी सतीश कौशिक यांचे पार्थिव हे दिल्लीहून मुंबई (Mumbai) येथे पोहचले.
सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत रात्री 8.23 ला अंत्यसंस्कार झाले असून त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. रिपोर्टनुसार सतीश कौशिक यांच्या भावाने मुखाग्नि दिलाय. सतीश कौशिक यांचे पार्थिव दिल्लीमधून मुंबईत आणले गेले होते. सतीश कौशिक यांचे पार्थिव हे मुंबईत त्याच्या घरी पोहचल्यानंतर अनेक बाॅलिवूड कलाकारांनी गर्दी केली.
सलमान खान याच्यापासून ते रणबीर कपूरपर्यंत जवळपास सर्वच स्टार सतीश कौशिक यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहचले. यावेळी सोशल मीडियावर सलमान खान याचा व्हिडीओ व्हायरल झाला. अभिषेक बच्चन हा देखील सतीश कौशिक यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहचला.
सतीश कौशिक यांच्यावर वर्सोवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी अनेक मोठे स्टार रडताना दिसले.
सतीश कौशिक यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार, सतीश कौशिक यांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालात त्यांच्या शरीरावर एकही जखम आढळली नाहीये. सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.
अभिनेते असण्यासोबतच सतीश कौशिक हे एक उत्कृष्ट दिग्दर्शक देखील होते. दिग्दर्शक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट कागज होता. ज्यामध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत दिसले. सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट इमर्जन्सी आहे, ज्याचे दिग्दर्शन कंगना रणौत हिने केले आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट अजून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाहीये.
अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. अनुपम खेर यांच्या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांच्यामध्ये खास मैत्री होती. सतीश कौशिक यांच्या अंतिम दर्शनासाठी अनुपम खेर हे देखील पोहचले होते. यावेळी अनुपम खेर हे ढसाढसा रडताना दिसले. सतीश कौशिक यांनी आपल्या करिअरमध्ये तब्बल 100 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
वयाच्या 66 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी शेवटचा श्वास घेतला. सतीश कौशिक यांच्या मॅनेजरने सांगितले की, बुधवारी सकाळी दहा वाजता होळी साजरी करण्यासाठी दिल्लीतील द्वारका सेक्टर 23 येथील पुष्पांजली येथे आले होते. होळी साजरी केल्यानंतर त्यांनी पुष्पांजली येथे मुक्काम केला. रात्री बाराच्या सुमारास त्यांनी फोन करून छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यांनी त्याला तात्काळ फोर्टिस रुग्णालयात नेले असता तिथेच गेटवरच त्याचा मृत्यू झाला.