मुंबई : अभिनेते, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणून प्रत्येक भूमिका उत्तम प्रकारे साकार करणारे सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने सतीश कौशिक यांचे निधन झाले. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ बघायला मिळाली. बाॅलिवूड (Bollywood) विश्वावर तर शोककळा पसरली. सतीश कौशिक यांचे निधन सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारे नक्कीच होते. सतीश कौशिक यांना गुरुग्राम येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. सतीश कौशिक यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका यांचे काही फोटो व्हायरल झाले. वडिलांच्या निधनानंतर मुलगी वंशिका हिचे झालेले हाल पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे खूप चांगले मित्र होते. अनुपम खेर यांनीच सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी सर्वात अगोदर सांगितली.
सतीश कौशिक यांच्या निधनानंतर 13 एप्रिल रोजी त्यांची पहिली बर्थ अनिवर्सरी म्हणजेच जयंती पार पडली. यानिमित्त्याने मुंबईतील जुहू परिसरातील इस्काॅनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी, चित्रपट निर्मात्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात प्रत्येकजण सतीश कौशिक यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत होते.
सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका हिने यावेळी वडिलांसाठी लिहिलेले पत्र वाचले. वंशिका हिने वडील (सतीश कौशिक) यांच्यासाठी लिहिलेले पत्र वाचण्यास सुरूवात केली आणि तिथे उपस्थितांपैकी प्रत्येक जण भावूक झाल्याचे बघायला मिळाले. यावेळी अनेकांना आपले अश्रू लपवणे अवघड झाले. वंशिका पत्र वाचत असताना अनुपम खेर हे तर ढसाढसा रडताना दिसले.
वंशिका पत्र वाचून दाखवताना म्हणाली की, हॅलो पापा…मला माहित आहे की तुम्ही आता या जगामध्ये नाहीत. पण मला तुम्हाला हे सांगायचे आहे की, मी तुमच्यासाठी नेहमीच आहे. तुमच्या मित्रांनी मला मजबूत राहण्यास शिकवले आहे. पण हे सत्य आहे की, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. पापा मला तुमची प्रचंड आठवण येते. हे सर्वकाही घडणार आहे हे मला माहिती नव्हते. हे जर मला माहिती असते तर मी तुमच्यासोबत खूप वेळ घालवला असता.
मी शाळेत देखील गेले नसते. मी तुम्हाला एकदा घठमिठी मारली असती. पण आता तुम्ही कुठेतरी गेले आहात. तुम्ही नेहमीच माझ्या हृदयात असणार आहेत. अनेकदा मला वाटते की, चित्रपटांमध्ये कसा चमत्कार घडतो तसे काही व्हावे आणि तुम्ही जिवंत व्हावे. मी शाळेतील अभ्यास नाही केला की, मला आई ज्यावेळी रागवते, त्यावेळी मी काय करू हे मला कळत नाही. मला आता शाळेत जाण्याची पण इच्छा अजिबात होत नाही.
पापा मला सर्व वेळ तुझची आठवण येते. मी सुद्धा पूजा केली आहे, कारण तुम्ही स्वर्गात जावे आणि सुखी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तिथे सर्वात मोठ्या बंगल्यात राहा आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरा, मोठ्या गाड्या चालवा. चमकदार जेवण करा. पुढे वंशिका म्हणते, पापा तुम्ही तिथेच थांबा कुठेही जाऊ नका. मी तुम्हाला भेटण्यासाठी 90 वर्षांनी तिकडे येते. पण त्यादरम्यान प्लीज तुम्ही मला विसरून जाऊ नका.
मी जेव्हाही डोळे बंद करते, त्यावेळी तुमचा चेहरा हा माझ्यासमोर येतो. मला योग्य दिशा द्या म्हणजे मी पुढे जात राहिल. तुम्ही नेहमीच माझ्या आयुष्यामध्ये राहाल. आय लव्ह यू…तुम्ही जगातील सर्वात बेस्ट वडील आहात. आता वंशिका हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. वंशिका हिचा व्हिडीओ पाहून सर्वचजण भावूक झाल्याचे बघायला मिळत आहे.