मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपासून एक चर्चा जोर धरू लागली की, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा मुंबईमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना स्पाॅट केले गेले. मात्र, परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या नात्यावर कधीच भाष्य केले नाही. परिणीती चोप्रा हिला ज्यावेळी राघव याच्याबद्दल विचारले जायचे, त्यावेळी ती लाजायची. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा आज दिल्ली (Delhi) येथे पार पडलाय. अत्यंत राॅयल स्टाईलमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दिसले. चाहते आता यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत.
नुकताच परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही खास फोटो हे शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा लूक जबरदस्त दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी त्यांच्या रिंग देखील दाखवल्या आहेत. आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. फोटोमध्ये परिणीती आणि राघव रिंग फ्लॉन्ट करताना देखील दिसत आहेत.
परिणीती चोप्रा हिने इंस्टाग्रामवर हे खास फोटो शेअर केले आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा जवळचे मित्र, नातेवाईक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये राघव याने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून परिणीती चोप्रा हिने हलकासा क्रिम रंगाचा ड्रेस घातला असून फोटोमध्ये परिणीती ही राघवच्या कुशीत बसलेली दिसत आहे.
लंडनमध्ये पहिली भेट ते साखरपुड्यापर्यंतचा यांचा प्रवास अत्यंत जबरदस्त राहिला आहे. परिणीती चोप्रा ही बाॅलिवूडमधील टाॅपची अभिनेत्री आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा आहे. परिणीती चोप्रा हिच्या साखरपुड्यासाठी बहीण प्रियांका चोप्रा ही देखील दिल्लीमध्ये दाखल झाली. ज्याचे काही व्हिडीओ अगोदरच व्हायरल झाले.
अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये यांचा साखरपुडा पार पडलाय. 150 लोक यांच्या साखरपुड्यामध्ये उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याला उपस्थित होते. दिल्लीतल्या कपूरथला हाउसमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडलाय.
बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना शुभेच्छा देण्यास सुरूवात केलीये. काही दिवसांपूर्वी एका आम आदमी पार्टीच्या मोठ्या नेत्याने परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा फोटो शेअर करत यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर हे पक्के झाले होते की, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे लवकरच साखरपुडा करणार आहेत. परिणीती चोप्रा हिने शेअर केलेली पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.