मुंबई : बाॅलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आलिया सिद्दीकी हिने एक व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर करत म्हटले होते की, मध्यरात्री मला आणि माझ्या मुलांना घराबाहेर काढण्यात आले असून आम्हाला घरात घेतले जात नाहीये. माझ्याकडे फक्त 81 रूपये असल्याने मी माझ्या मुलांसोबत कोणत्याही हाॅटेलमध्येही जाऊ शकत नाही. आलियाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर अनेकांनी नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या विरोधात संताप व्यक्त केला.
आलिया सिद्दीकी ही व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या बंगल्याबाहेर उभी दिसत होती. मात्र, नवाजुद्दीन सिद्दीकी याने आलिया सिद्दीकी हिच्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिले. एका निवेदनात नवाजुद्दीन सिद्दीकी याने सांगितले की, ते घर आई मेहरुन्निसा सिद्दीकी हिच्या नावावर केले आहे. त्यामुळे नवाजुद्दीन त्या घराशी संबंधित कोणताही निर्णय घेऊ शकत नाही.
आता आलिया सिद्दीकी हिने शेअर केलेल्या व्हिडीओवर उर्फी जावेद हिची प्रतिक्रिया आली आहे. आलिया सिद्दीकी हिचा तो व्हिडीओ उर्फी जावेद हिने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. इतकेच नाहीतर हा व्हिडीओ शेअर करताना उर्फी जावेद हिला तिचे जुने दिवस आठवले. आता उर्फी जावेद हिची ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
उर्फी जावेद हिने आलिया सिद्दीकी हिचा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, काहीच बोलायचे नाहीये…माझे मन तुटले… माझ्या दिवसांची मला आठवण झाली. फक्त सहानुभूती…उर्फी जावेद हिने देखील अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बघितल्या आहेत. उर्फी जावेद हिचे वडील कायमच तिला शिवागाळ करत असत तर आई तिला मारहाण करायची.
गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याची पत्नी आलिया ही त्याच्यावर सतत गंभीर आरोप करताना दिसत आहे. इतकेच नाहीतर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांचे भांडण थेट कोर्टामध्ये पोहचले आहे. आलिया सिद्दीकी ही सोशल मीडियावर सतत व्हिडीओ शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकी याला टार्गेट करताना दिसत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आईने आलिया विरोधात काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केलीये.