मुंबई : अभिनेता सोनू सूद गरजू लोकांना मदत करण्यासाठी ओळखला जातो. कोरोनाच्या काळात सोनूने अनेकांना मदत केलीये. मात्र, सोनू व्यतिरिक्तही असे बरेच कलाकार (Artist) आहेत, जे गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीला कायम धावून जातात. त्यापैकीच एक असा कलाकार आहे, जो चित्रपटांमध्ये (Movie) कायमच खलनायकची भूमिका करतो. परंतू रिअल लाईफमध्ये तो सर्वसामान्य लोकांसाठी एक नायकच ठरलांय. हा दुसरा तिसऱ्या कोणी कलाकार नसून सिंघम चित्रपटात खलनायकाची भूमिका करणारा जयकांत शिकरे अर्थात प्रकाश राज (Prakash Raj) आहे.
This is the village adopted by @prakashraaj
Great progress made in tandem with local MLA @AnjaiahYTRS Garu ? https://t.co/yGfYdloaFT
— KTR (@KTRTRS) September 20, 2022
प्रकाश राज सध्या खास केलेल्या कामामुळे चर्चेत आहे. प्रकाश राजने तेलंगणातील एक गाव दत्तक घेऊन गावाचा जबरदस्त विकास केलाय. एखाद्या मोठ्या शहरात देखील ऐवढे सुंदर रस्ते नसतील तेवढे तेलंगणातील या गावात बघायला मिळतात. प्रकाश राज यांनी कोंडा रेड्डीपल्ली केशमपेट या गावाचे रूपच बदलून टाकल्याचे दिसते आहे. गावाचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रकाश राज यांचे काैतुक आता सर्वच स्तरातून केले जातंय.
तेलंगणा राज्यातील मंत्री केटीआर यांनी ही माहिती दिली आहे. केटीआर यांनी गावाचे हे फोटो रिट्विट केले आहेत. इतकेच नाही तर त्यांनी प्रकाश राज आणि तेथील आमदारांचे काैतुकही केले आहे. यावर अभिनेत्याने कमेंट करत लिहिले की, हे सर्व काही तुमच्या पाठिंब्यामुळे झाले आहे. आता प्रकाश राज यांचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये गावाचे एकून चार फोटो शेअर करण्यात आले आहेत.