बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमींच्या (Shabana Azmi) भाचीला मुंबईत ‘ओला’द्वारे (Ola) प्रवास करताना अत्यंत वाईट अनुभव आला. शबाना यांची २१ वर्षीय भाची मेघना हिने सोशल मीडियावर तिला आलेला अनुभव लिहिला. या पोस्टमध्ये तिने लिहिलं, कॅब चालकाने तिला रात्री उशिरा मधेच रस्त्यात उतरण्यास सांगितलं. यामुळे तिला दादरच्या (Dadar) पुलावर बराच वेळ दुसऱ्या टॅक्सीसाठी वाट पहावी लागली. भाचीची ही पोस्ट ट्विटरवर शेअर करत शबाना यांनी घडलेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. ‘ओलाने प्रवास करताना माझ्या भाचीला हा भयानक अनुभव आला. हे अत्यंत अस्वीकार्य आहे’, असं शबाना यांनी ट्विटरवर लिहिलं. या पोस्टनंतर ओला कंपनीने त्यांची माफी मागितली आहे.
मेघनाची फेसबुक पोस्ट-
मेघनाने तिच्या फेसबुक पेजवर लिहिलं, ‘लोअर परेल ते अंधेरी पश्चिमला जाण्यासाठी मी ओला बुक केली होती. कॅब ड्रायव्हरने माझी राइड स्वीकारली आणि तो मला पिकअप करायला आला. राईड सुरू झाल्यानंतर पाच मिनिटांनंतर त्याला जाणवलं की पुढे खूप ट्रॅफिक आहे आणि घरी पोहोचायला त्याला उशीर होईल. म्हणून त्याने मला दादर पुलावर मध्यभागी उतरायला लावलं. रात्री खूप उशीर झाला होता, त्यामुळे दुसरी टॅक्सी शोधणं कठीण झालं होतं. मला पुलावरून उतरून दादर मार्केटमधून चालत जावं लागलं. तिथून पुढे मला दोन तास लागले. ओला कॅब चालकाचं नाव मुस्तकीन खान आहे. कृपया मदत करा, हे अस्वीकार्य आहे.’
My 21 yr old niece had a horrific experience with @Olacabs.https://t.co/37D8WIuWXr totally unacceptable @ola_supports
— Azmi Shabana (@AzmiShabana) February 26, 2022
ओलाने मेघनाच्या फेसबुक पोस्टवर कमेंट करत प्रतिसाद दिला. ‘आम्ही समजू शकतो की हे तुम्हाला अत्यंत वाईट अनुभव आला असेल. असा अनुभव तुम्हाला यावा अशी आमची कधीच इच्छा नव्हती. कृपया तुमच्या प्रवासचा CRN आम्हाला इनबॉक्सद्वारे शेअर करा, जेणेकरून आमची टीम तुम्हाला लवकरात लवकर मदत करू शकेल,’ असं त्यांनी लिहिलं. मात्र त्यानंतर तक्रारीबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पुढे काही संवाद झाला नाही.
संबंधित बातम्या: ऑनलाईन दारू मागवणं पडलं महागात, प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांची फसवणूक