मुंबई : नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला हाॅलिवूडपासून ते बाॅलिवूडपर्यंत अनेकांनी हजेरी लावली. आता या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ (Video) व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यामध्ये बाॅलिवूड (Bollywood) कलाकारांचा जलवा बघायला मिळाला. रणवीर सिंह, प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट या सारख्या बाॅलिवूड स्टारने धमाकेदार डान्स केला. इतकेच नाहीतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने यावेळी त्याच्या पठाण चित्रपटातील झुमे जो पठाण या गाण्यावरही जबरदस्त डान्स केला.
शाहरुख खान हा नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्यात हाॅस्ट करताना दिसला. फक्त झुमे जो पठाण याच गाण्यावर नाही तर थेट साऊथ चित्रपट आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावरही शाहरुख खान डान्स करताना दिसला. नाटू नाटू गाण्यावर शाहरुख खान याने डान्स केल्याचे बघताच चाहते आनंदी झाले.
शाहरुख खान हा देखील नाटू नाटू गाण्यावर डान्स करण्यापासून स्वत: ला रोखू शकला नाहीये. आता शाहरुख खान याचा नाटू नाटू गाण्यावर डान्स करतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे फक्त डान्सच नाही तर चक्क शाहरुख खान हा नाटू नाटू गाणे म्हणताना देखील दिसला आहे.
शाहरुख खान याने झूमे जो पठाण या गाण्यावर देखील डान्स केला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत रणवीर सिंह आणि वरुण धवन यांनीही डान्स केला. शाहरुख खान याने त्याच्या पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आणि या चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी केलीये. नीता मुकेश अंबानी यांच्या कल्चरल सेंटर उद्घाटन सोहळ्याला हाॅलिवूडचे देखील अनेक स्टार उपस्थित होते.
रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांनीही धमाकेदार डान्स या कार्यक्रमात केलाय. विशेष म्हणजे तब्बल 8 वर्षांनी परत एकदा एकत्र ही जोडी चाहत्यांना बघायला मिळाली. गल्लां गूड़ियां या गाण्यावर रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांनी डान्स केला. आता यांच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा ही मुलगी मालती आणि पती निक जोनस यांच्यासोबत भारतामध्ये आलीये.