मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असूनही शाहरुख खान आपल्या चाहत्यांच्या संपर्कात कायम असतो. शाहरुख आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या आयुष्यामध्ये नेमके काय सुरू आहे, याची माहिती देतो. पुढच्या वर्षी शाहरुख खानचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटांची चाहते देखील आतुरतेने वाट पाहात आहेत.
पुढच्या वर्षी रिलीज होणाऱ्या शाहरुख खानच्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे डंकी हा आहे. या चित्रपटात शाहरुख खान महत्वाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता सुरूवातीपासूनच आहे.
शाहरुख खान याने नुकताच सौदी अरेबिया येथील त्याच्या डंकी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याची माहिती त्याने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलीये. याचा एक व्हिडीओ शाहरुख खान याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
A very big Shukran to @mocsaudi_en , the team and all who made this shoot schedule of #Dunki so smooth… pic.twitter.com/gjCqCMRSZk
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 30, 2022
ज्याठिकाणी या डंकी चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले, त्याच ठिकाणावरून शाहरुख खान याने हा व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान हा सौदी अरेबियाच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे मनापासून आभार मानताना देखील दिसतोय.
व्हिडिओमध्ये शाहरुख खानचा लूक एकदम जबरदस्त असा दिसत आहे. काळा कोट शाहरुखने घातला आहे. व्हिडीओमध्ये मोठे डोंगर शाहरुख खानच्या मागे दिसत असून रेगिस्थान दिसत आहे.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि मुलगा आर्यन खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. हे दोघेही करण जोहरच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. मात्र, यांच्या चित्रपटाचे नाव असून कळू शकले नाहीये.