मुंबई : पठाण चित्रपटाच्या रिलीजनंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे सर्वत्र काैतुक केले जात आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर दणदणीत असे पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची वाट सातत्याने पाहात होते. शेवटी तो दिवस आला आणि २५ जानेवारी रोजी शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पुनरागमन केले. सुरूवातीला पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिजील झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. इतकेच नाही तर या दरम्यान शाहरुख खान याला जीवे मारण्याच्या थेट धमाक्या देखील देण्यात आल्या. पठाण चित्रपटातील गाणे बेशर्म रंग याच्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल देखील आक्रमक झाल्याचे बघायला मिळत होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाबद्दल मोठा वाद सुरू होता. इतकेच नाही तर सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात होती. मात्र, यावर शाहरुख खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याच व्यक्तीने काही भाष्य केले नाही.
पठाण चित्रपटाच्या विरोधात देशातील अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. परंतू या सर्वांचा फायदा पठाण चित्रपटालाच झाल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून पुढे आले. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासह दीपिका पादुकोण हिने देखील जबरदस्त भूमिका केलीये.
Tum baap bano…main hero hi theek hoon. https://t.co/E7UfidumyN
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 4, 2023
पठाण चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरुख खान हा कोणत्याच कार्यक्रमामध्ये किंवा विविध शहरांमध्ये अजिबात केला नाही. चित्रपट रिलीजच्या अगोदर शाहरुख खान या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता.
विशेष म्हणजे Ask SRK सेशनमधून तो सतत आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधत चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता. पठाण या चित्रपटाला रिलीज होऊन आता जवळपास दहा दिवस झाले आहेत. मात्र, तरीही शाहरुख खान हा Ask SRK सेशनमधून चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे देत आहे.
Ask SRK सेशनमध्ये एका चाहत्याने शाहरुख खान याला त्याच्या वयावर एक प्रश्न विचारत म्हटले की, तू पुढेही अशाप्रकारे अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे की, अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे?
चाहत्याच्या या प्रश्नावर शाहरुख खान याने अत्यंत हटके पध्दतीने उत्तर देत लिहिले की, तू बाप बन…मी हिरो म्हणूनच ठिक आहे…शाहरुख खान याचे हे उत्तर चाहत्यांना प्रचंड आवडले आहे. म्हणजेच अजून काही दिवस शाहरुख खान हा चित्रपटांमध्ये हिरोच्याच भूमिकेत असणार आहे.