मुंबई : शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. पठाण या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सुरूवातीपासून मोठी क्रेझ होती. कारण झिरो या चित्रपटानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने मोठा ब्रेक घेतला होता. काही चाहत्यांना तर चिंता होती की, शाहरुख खान हा पुनरागमन करणार की नाही? पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने पुन्हा एकदा दाखून दिले आहे की, त्याला बाॅलिवूडचा किंग उगाच म्हणत नाहीत. पठाण या चित्रपटाने जबरदस्त बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष बाब म्हणजे पठाण या चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबतच सलमान खान याची देखील झलक पाहण्यास मिळाली. शाहरुख खान हा धोक्यामध्ये असताना सलमान खान हा त्याला वाचवण्यास येतो, असे दाखवण्यात आले आहे. पठाण या चित्रपटाने फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही जबरदस्त अशी कामगिरी केलीये.
शाहरुख खान याच्या पठाण या चित्रपटामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख खान याच्यासोबतच दीपिका पादुकोण हिच्या अभिनयाचे देखील काैतुक केले जात आहे.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाचे जास्त प्रमोशन करण्यावर भर दिला नाही. प्रमोशन ऐवजी शाहरुख खान हा यादरम्यान सोशल मीडियावर सक्रिय होता. Ask SRK सेशनमध्ये तो आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत होता.
पठाण या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. पठाण चित्रपटाची कामगिरी पाहून अनेक बाॅलिवूड चित्रपट निर्माते आणि कलाकार हे शाहरुख खान याचे काैतुक करताना दिसत आहेत.
5000 crores Pyaar. 3000 crore Appreciation. 3250 crores hugs….2 Billion smiles and still counting. Tera accountant kya bata raha hai?? https://t.co/P2zXqTFmdH
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 4, 2023
पठाण चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पाहून अनेकांनी हे कलेक्शन फेक असल्याचे म्हटले होते. आता Ask SRK सेशनमध्ये यावरच शाहरुख खान याला प्रश्न विचारण्यात आलाय.
जगभरातून १० दिवसांमध्ये पठाण या चित्रपटाने ७२५ कोटी कलेक्शन केले आहे. यावर एक चाहता शाहरुख खान याला म्हणाला की, पठाण चित्रपटाचे रिअल कलेक्शन नेमके किती आहे?
यावर शाहरुख खान याने अत्यंत हटके पध्दतीने उत्तर देत लिहिले की, ५००० कोटीचे प्रेम, ३०० कोटीचे काैतुक, ३२५० कोटीचे हग्स, 2 अब्ज स्माईल…अजून सर्व कलेक्शन सुरूच आहे. शाहरुख खान याचे हे उत्तर अनेकांना आवडले आहे.