मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासूनच मोठा धमाका करण्यास सुरूवात केलीये. चित्रपटाने बाॅक्स आॅफिस सुसाट कामगिरी केलीये. चित्रपटाच्या ओनपिंग डेलाच चित्रपटाने जगभरातून तब्बल १०० कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. कोरोनानंतर बाॅक्स आॅफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते. एका मागून एक असे बरेच चित्रपट (Movie) बाॅलिवूड फ्लाॅप गेले. विशेष बाब म्हणजे रणबीर कपूर, रणवीर सिंह, अक्षय कुमार, आमिर खान अशा मोठ्या बाॅलिवूड (Bollywood) स्टारचे चित्रपट फ्लाॅप गेल्याने मोठा धक्का बाॅलिवूडला बसला. इतकेच नाही तर चित्रपट निर्माता रोहित शेट्टी याचा सर्कस चित्रपट देखील फ्लाॅप गेला. रोहित शेट्टी याचे चित्रपट काॅमेडीवर आधारित असतात आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटांना कायमच प्रेक्षकांचे प्रेम मिळते. परंतू त्याचा सर्कस चित्रपट फ्लाॅप गेला. कोरोनानंतर बाॅलिवूड चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. मात्र, दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसले.
शाहरुख खानने पठाण चित्रपटाची धमाकेदार ओपनिंग करत परत एकदा दाखून दिले की, उगाच आपल्याला बाॅलिवू़डचा किंग म्हटले जात नाही. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे.
Have fun but keep it safe thank u https://t.co/F3WLBlmW7Y
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 6, 2023
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटामध्ये चाहत्यांना सलमान खान याची झलक देखील बघायला मिळाली. पठाण या चित्रपटामध्ये सलमान खान याने कॅमिओ केलाय. अनेकांनी पठाण चित्रपटासाठी शाहरुख खान याचे काैतुकही केले आहे.
शाहरुख खान याने पठाण चित्रपटाचे प्रमोशन फार काही केले नाहीये. तो फक्त चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता.
Thank you Peru… lots of love https://t.co/p4WeNxZgeW
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 6, 2023
Ask SRK सेशनमधून शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देत होता. इतकेच नाही तर चित्रपट रिलीज झाल्यानंतरही तो Ask SRK सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो.
पठाण चित्रपटाचे यश पाहून शाहरुख खान हा भारावून गेल्याचे दिसत आहे. शाहरुख खान याने चाहत्यांनी शेअर केलेल्या काही पोस्ट रिशेअर करत पठाण चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.
Thank you Peru… lots of love https://t.co/p4WeNxZgeW
— Shah Rukh Khan (@iamsrk) February 6, 2023
पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट २०१९ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.