मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी करत शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (Movie) पठाण हाच ठरला. पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने लगेचच डंकी आणि जवान चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान हा डंकी चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी कश्मीर येथे गेला होता. याचे अनेक व्हिडीओ (Video) देखील व्हायरल झाले.
फक्त शाहरुख खान हाच नाही तर शाहरुख खान याची मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खान हे देखील कायमच चर्चेत असतात. यंदाच शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहरुख खान हा नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सेशनचे आयोजन करतो.
नुकताच शाहरुख खान याने एका सेशनचे आयोजन केले होते. या सेशनमध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खान याला मोठी विनंती केली. युजर्स म्हणाला की, हे D’YAVOL X जॅकेट थोडेसे 1000 ते 2000 वाले पण ठेवा…जर आता D’YAVOL X जॅकेट घेतले तर घर विकण्याची पाळी येईल…
Yeh D’Yavol X wale log mujhe bhi sasti nahi bech rahe….kuch karta hoon..!! #Jawan https://t.co/PLW9WUd6mg
— Shah Rukh Khan (@iamsrk) May 6, 2023
यावर शाहरुख खान हा धमाकेदार उत्तर देताना दिसला. शाहरुख खान म्हणाला की, हे D’YAVOL X वाले लोक मलाही स्वस्तामध्ये विकत देत नाहीयेत. मी काहीतरी करतो…#Jawan. मुळात म्हणजे शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा काही दिवसांपूर्वी त्याच्या कपड्यांच्या ब्रँडमुळे चर्चेत आला. आर्यनने कपड्यांचा ब्रँड सुरू केला आहे.
आर्यन खान याच्या ब्रँडचे कपडे अत्यंत महाग आहेत. D’YAVOL X या आर्यन खान याच्या ब्रँडचे कपडे महागडे असून जॅकेटची किंमत लाखांच्या घरात आहे तर शर्टची किंमत ही तब्बल हजारांच्या घरात आहेत. यामुळेच हा चाहता D’YAVOL X ब्रँडच्या कपड्यांच्या किंमत कमी करण्याची विनंती करताना दिसला. लवकरच शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.