मुंबई : शाहरुख खान हा सध्या त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यापासून मोठा वाद सुरू आहे. बेशर्म रंग गाण्याच्या वादामध्ये चित्रपट निर्मात्यांनी पठाणचा ट्रेलर रिलीज करण्यास वेळ लावला. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे चाहते चित्रपटाच्या ट्रेलरसाठी आतुर होते. शेवटी १० जानेवारी रोजी ट्रेलर रिलीज करण्यात आला. पठाण चित्रपटाच्या ट्रेलरने धुमाकूळ घातला असून हा ट्रेलर प्रेक्षकांना जबरदस्त आवडताना दिसतोय. शाहरुख खान हा तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पठाणच्या माध्यमातून पुनरागमन करतोय. या चित्रपटाकडून खूप जास्त अपेक्षा नक्कीच आहेत.
पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज होतोय. शाहरुख खान याच्यासह चित्रपटाची टीम प्रमोशन करण्यामध्ये व्यस्त आहे. शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसतोय.
काही दिवसांपूर्वी शाहरुख खान याने आस्क एसआरके (AskSRK) सेशन ठेवले होते. या सेशनमध्ये शाहरुख खान याने चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली होती. विशेष म्हणजे काहींनी शाहरुख खान याला पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारले.
एका चाहत्याने तर शाहरुख खान याला तू महिन्याला किती पैसे कमावतो हाच प्रश्न थेट विचारून टाकला होता. यावर शाहरुख खान याने अत्यंत प्रेमाने उत्तर दिले. शाहरुख खान हा चाहत्यांच्या संपर्कात राहतोय.
Thank you @iamsrk For Taking Your Time out for us, 2:00 AM
No other superstar did this for their fans like you do, calling us inside your Hotel Room & giving Us Full Time, attention & respect.
Thank you for your blessings.I am sorry to disturb you at late night, But I Love u. pic.twitter.com/q6Qbxa1geO
— Jatin Gupta (@iamjatin555) January 11, 2023
नुकताच शाहरुख खान याच्या चाहत्याने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो आता तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या चाहत्याने हे फोटो शेअर करताना एक खास पोस्ट देखील लिहिली आहे.
पठाण चित्रपट काही दिवसांमध्येच रिलीज होणार असल्याने शाहरुख खान हा प्रमोशनमध्ये प्रचंड बिझी आहे. मात्र, असे असताना देखील रात्रीच्या दोन वाजता शाहरुख खान हा त्याच्या चाहत्यांना हाॅटेलमध्ये भेटला आहे.
ऐकून धक्का बसला ना? परंतू हे खरे आहे. दिल्लीमध्ये आपल्या चाहत्याला रात्री दोन वाजता शाहरुख खान त्याच्या हाॅटेल रूममध्ये भेटला आहे. ज्याचे फोटो या चाहत्यानेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जतिन गुप्ता असे या चाहत्याचे नाव असून फोटो शेअर करत त्याने लिहिले की, भेटण्यासाठी रात्री दोन वाजता वेळ काढल्याबद्दल शाहरुख खान धन्यवाद…जे तुम्ही केले ते दुसरा कोणताच सुपरस्टार करू शकत नाही.
तुम्ही हाॅटेल रूममध्ये आम्हाला बोलावले आणि पुर्ण वेळ दिला, सन्मान दिला. इतक्या रात्री तुम्हाला डिस्टर्ब केल्याबद्दल खरोखर साॅरी…लव्ह यू…आता ही पोस्ट व्हायरल होत आहे.