मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे अजूनही चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी खेळी करत थेट चित्रपटाच्या तिकिटामध्ये मोठी कपात केलीये. पठाण चित्रपटानंतर रिलीज झालेला सेल्फी आणि शहजादा हे दोन्ही चित्रपट (Movie) फ्लाॅप गेले आहेत. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची हवा बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्यासोबत सलमान खान याचीही झलक बघायला मिळाये.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. दीपिका पादुकोण हिने या गाण्यामध्ये भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. यावेळी अनेकांनी थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळत होते.
पठाण चित्रपटाने ओपनिंग डेला जगभरातून तब्बल 100 कोटींची कमाई केली. बाॅलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे आता बाहुबली चित्रपटाचे रेकाॅर्ड देखील पठाण चित्रपटाने तोडल्याचे सांगण्यात येतंय. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरलाय.
TOP 4… HIGHEST GROSSING *HINDI* FILMS…
1. #Pathaan
2. #Baahubali2 #Hindi
3. #KGF2 #Hindi
4. #DangalNOTE: #India biz. Nett BOC. #Hindi version ONLY. pic.twitter.com/fay38eStHp
— taran adarsh (@taran_adarsh) March 3, 2023
शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाहुबली 2 चा हिंदी व्हर्जनचा बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडलाय. पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी ट्विट करून ही माहिती दिलीये आणि आनंद व्यक्त केलाय. बाहुबली 2 च्या हिंदी व्हर्जनने एकूण 511 कोटींची कमाई केली आहे. ज्याचा रेकॉर्ड शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने तोडला आहे.
पठाण चित्रपटाने रिलीजच्या 37 व्या दिवशी भारतामध्ये 75 लाख रूपयांची कमाई केलीये. आता पठाण चित्रपटाने 510.55 कोटीचे कलेक्शन केले. विशेष म्हणजे अजूनही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची कमाई बघायला मिळत आहे. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपटाने तूफान कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये.
चित्रपट रिलीज झाल्यानंतर शाहरुख खान याने वादावर भाष्य केले होते. शाहरुख खान म्हणाला की, मी कोणत्याही एका धर्माच्या लोकांसाठी चित्रपट तयार करत नाही. इतकेच नाहीतर चित्रपटामधून मनोरंजन करण्याचा उद्देश असतो. कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा उद्देश अजिबात नसतो.