मुंबई : शाहरुख खान जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. पठाण चित्रपटामुळे शाहरुख चर्चेत आहे. नुकताच शाहरुख खान याने त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाचे शूटिंग पुर्ण केले असून याचा एक व्हिडीओ शाहरुखने सोशल मीडियावर शेअर केला होता. शाहरुख खानचे चाहते गेल्या काही वर्षांपासून त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 2023 मध्ये शाहरुख खानचे तब्बल तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात आहेत.
शाहरुख खान शेवटी झिरो या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर शाहरुख खान चित्रपटामध्ये दिसला नाहीये. आता 2023 मध्ये शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चार वर्ष चित्रपटांपासून दूर असण्याचे कारण अखेर शाहरुख खान याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. विशेष म्हणजे शाहरुखने हा मोठा ब्रेक त्याच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी घेतला असल्याचे देखील त्याने सांगितले आहे.
शाहरुख खान म्हणाला की, माझी मुलगी जेंव्हा विदेशात शिक्षण घेत होती, त्यावेळी तिला जेंव्हा एकटे वाटायचे तेंव्हा ती फोन करून सांगत होती. परंतू मी चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यामध्ये सोडून तिला भेटण्यासाठी आणि तिच्यासोबत वेळ घालवण्यासाठी जाऊ शकत नव्हतो.
मग अशावेळी माझी बायको गाैरी लंडनला जायची. मी माझ्या मुलांना कधीच वेळ देऊ शकलो नव्हतो. मग मी विचार केला की, आपण कामामधून थोडा ब्रेक घ्यायला हवा आणि जेंव्हा मला माझी मुलगी सुहाना तिला एकटे वाटत आहे, असा फोन करेल तेंव्हा मी लगेचच जाईल.
मी नेहमी वाट बघत बसायचो की, ती मला आता फोन करेल मग फोन करेल…पण तिने या काळात मला एकदाही एकटे वाटत आहे किंवा तुम्ही या म्हणून फोनच केला नाही. मग एक दिवस मी तिला फोन करून म्हटलो की, तू मला एकटे वाटत आहे असे म्हणून फोन का करत ना?
यावर माझी मुलगी म्हणाली की, मी इथे खूप जास्त खुश आहे, तुम्ही नका येऊ इकडे. माझ्या मुलीने मला हेही विचारले की, तुम्ही काम का करत नाही? मग मी तिला कारण सांगितले. परंतू ती म्हणाली की, तुम्ही काम करा मी इकडे खुश आहे.