मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत असून हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. अवघ्या पाच दिवसांमध्ये चित्रपटाने रेकाॅर्ड ब्रेक (Record break) कामगिरी केलीये. आरआरआर आणि KGF 2 सारख्या चित्रपटांना कमाईमध्ये मागे टाकत पठाण चित्रपट अनेक रेकाॅर्ड तयार करतोय. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खानचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चाहत्यांमध्ये पठाण चित्रपटाविषयी एक वेगळीच क्रेझ बघायला मिळत आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त पठाण चित्रपटाचेच वातावरण बघायला मिळत आहे. अनेक वर्षांनंतर चित्रपट (Movie) सुरू असताना चाहते थिएटरमध्ये डान्स करत व्हिडीओ काढताना दिसले. विशेष म्हणजे शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दणदणीत असे पुनरागमन केले आहे. शाहरुख खान याने आपल्या अभिनयातील ताकद परत एकदा प्रेक्षकांना दाखवली आहे.
मुळात म्हणजे पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच चर्चेत होता. हा शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ठरला आहे. शाहरुख खान याच्या याच पुनरागमनाची वाट चाहत्यांनी तब्बल चार वर्ष बघितली आहे.
२०१९ मध्ये शाहरुख खान याचा शेवटचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेल्याने शाहरुख खान हा निराश होता. झिरोनंतर चार वर्ष शाहरुख खान हा दुसऱ्या कोणत्याच चित्रपटामध्ये दिसला नव्हता.
चार वर्षांनंतर जोरदार असे पुनरागमन शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून केले. सुरूवातीला या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही केली होती.
प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर शाहरुख खान याच्या अभिनयाचे काैतुक सर्वांनीच केले. ५७ व्या वर्षातही शाहरुख खान याच्या अभिनयामध्ये तिच ताकद चाहत्यांना दिसली.
पठाण चित्रपटाने रविवारी बाॅक्स आॅफिसवर तब्बल ६२ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. पठाण चित्रपटाची धमाकेदार कामगिरी सुरू असताना आता शाहरुख खान मीडियासमोर येणार आहे. यावेळी शाहरुख खान काय खुलासा करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.