मुंबई : चार दिवसांमध्येच शाहरुख खान याच्या पठाण (Pathaan) चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. धमाकेदार ओपनिंग करत पठाण चित्रपटाने धमाका केला. चाहते गेल्या चार वर्षांपासून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पुनरागमनाची वाट पाहात होते. २५ जानेवारी रोजी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) चाहत्यांच्या भेटीला आलाय. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाला आणि फक्त पठाण चित्रपटाचीच हवा बघायला मिळाली. भारतामध्येच नाहीतर जगभरातमधून पठाण या चित्रपटाला चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट आता बाॅलिवूडमधील सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला असून अनेक रेकाॅर्ड हे पठाण चित्रपटाने तोडले आहेत. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर सुरू होती. परंतू याचा अजिबातच फटका पठाण चित्रपटाला बसला नाहीये.
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट बघायला गेलेल्या चाहत्यांचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. चित्रपटामध्ये गाणे सुरू झाले की, चाहते डान्स करताना देखील दिसत आहेत.
थोडक्यात काय तर पठाण या चित्रपटाची शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या अत्यंत जास्त आहे. आपल्या आवडत्या अभिनेत्याचा चित्रपट पाहण्यासाठी चाहते काहीही करू शकतात याचे एक उत्तम उदाहरण पुढे आले.
A disabled fan of @iamsrk, who cannot walk on his own feet. He rode on his friend’s shoulder from Bhagalpur in Bihar to watch the movie Pathan at Samsi Pawan Talkies cinema hall in Malda, West Bengal.❤️#FDFS#pathan#mausambigadchukahai
? pic.twitter.com/lYsl4kt8dM— Halim Hoque (@halim_hoque) January 25, 2023
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये शाहरुख खान याच्या चाहत्याने पठाण हा चित्रपट बघण्यासाठी बिहारवरून थेट पश्चिम बंगाल गाठले आहे. विशेष म्हणजे हा चाहता अपंग आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक मित्र आपल्या अपंग मित्राला पाठीवर घेऊन थिएटरच्या परिसरात दाखल झालाय. पठाण हा चित्रपट पाहण्यास तो बिहारमधील भागलपूर येथून पश्चिम बंगालमधील मालदा येथे आला आहे.
या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत असून एकाने लिहिले की, हा शाहरुख खान याचा मोठा फॅन दिसत आहे. दुसऱ्याने लिहिले की, ही फक्त पठाण चित्रपटाची ताकद आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ हा ट्विटरवर शेअर करण्यात आलाय.