Pathaan | तिसऱ्या आठवड्यामध्येही शाहरुख खान याच्या चित्रपटाची क्रेझ कायम, पठाणने तोडला बाहुबली 2 चा हा रेकाॅर्ड

| Updated on: Feb 14, 2023 | 6:09 PM

झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर तब्बल चार वर्ष शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते.

Pathaan | तिसऱ्या आठवड्यामध्येही शाहरुख खान याच्या चित्रपटाची क्रेझ कायम, पठाणने तोडला बाहुबली 2 चा हा रेकाॅर्ड
Follow us on

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने बाॅलिवूडमध्ये दणदणीत असे पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला होता. या चित्रपटाकडून शाहरुख खान याला मोठ्या अपेक्षा होत्या. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर तब्बल चार वर्ष शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी 2023 मध्ये शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून जबरदस्त असे पुनरागमन करत दाखवून दिले की, उगाच आपल्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही. कारण पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बाॅलिवूडचे अनेक चित्रपट बाॅक्स आॅफिस फ्लाॅप गेले होते. दुसरीकडे साऊथचे चित्रपट (South movies) बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी करत होते. चित्रपट फ्लाॅप जात असल्याने शाहरुख खान याने बाॅलिवूडला सोडचिठ्ठी देण्याचाही विचार केला होता, असे स्वत: शाहरुख खान याने सांगितले.

पठाण चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठा धमाका केला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरातून तब्बल 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. त्यानंतर अनेक रेकाॅर्ड चित्रपटाने आतापर्यंत आपल्या नावावर केले आहेत.

आता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला रिलीज होऊन तीन आठवडे झाले आहेत. मात्र, तरीही पठाण चित्रपटाची क्रेझ बाॅक्स आॅफिसवर बघायला मिळत आहे. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाणच ठरला आहे.

गेल्या शुक्रवारी पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर हिंदीमधून 5.75 कोटी रुपयांची कमाई केली. व्हॅलेंटाईन डेनिमित्त आज चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पठाण या चित्रपटाने 20 व्या दिवशी बाहुबली 2 चा एक रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटाने दिल्ली,एनसीआर सर्किटमध्ये 110 कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रभासच्या बाहुबली 2 ने आतापर्यंत या सर्किटमध्ये सर्वाधिक कमाई केली होती.

पठाण या चित्रपटाला विदेशामधून चांगले प्रेम मिळाले आहे. हिंदी भाषेमध्येही चित्रपटाने जबरदस्त कमाई नक्कीच केलीये. मात्र, साऊथच्या प्रेक्षकांना जोडण्यास पठाण चित्रपट अपयशी ठरला आहे. कारण म्हणावा तसा प्रतिसाद साऊथमध्ये चित्रपटाला भेटला नाहीये.