मुंबई : शाहरुख खान याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेला जबरदस्त कामगिरी करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. मुळात म्हणजे पठाण (Pathaan) चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर अनेक आरोप करण्यात आले आणि थेट चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करण्यात आली. शाहरुख खान याच्यासाठी आणि त्याच्या चाहत्यांसाठी पठाण हा चित्रपट अत्यंत खास आहे. कारण पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी तो दिवस आला आणि शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झाला. या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी ओपनिंग डेला करत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत.
पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल आक्रमक झाल्याचे बघायला मिळत होते. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची हवा बाॅक्स आॅफिसवर दिसली आणि चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल ५४ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले.
पठाण चित्रपटाची हवा फक्त भारतामध्येच नसून विदेशात देखील आहे. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला विदेशात देखील प्रेम मिळत आहे. ओपनिंग डेला विदेशामधून पठाण चित्रपटाने तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हाच चित्रपट ठरला आहे.
शाहरुख खान हा जरी बाॅलिवूड स्टार असला तरीही विदेशात देखील शाहरुख खान याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे. शाहरुख खान हा फक्त बाॅलिवूडचाच किंग नाहीये तर विदेशामध्येही शाहरुख खान हा खूप जास्त फेमस अभिनेता आहे.
शाहरुख खान याचे चाहते विदेशामध्ये देखील आहेत, याचे उत्तम उदाहरण म्हणजे त्याच्या पठाण चित्रपटाची विदेशातील कमाई. UAE मध्ये पठाण या चित्रपटाला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळत आहे. कारण UAE मध्ये सर्वाधिक कमाई करणारा बाॅलिवूडचा दुसरा पठाण हा चित्रपट ठरला आहे.
बाहुबली 2 या चित्रपटाने UAE मध्ये ८५ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले होते. पठाण या चित्रपटाने ८१ कोटींचे कलेक्शन केले, बजरंगी भाईजान – ७७ कोटी, दंगल – ७२ कोटी, सुलतान ७० कोटीचे कलेक्शन. पुढील काही दिवसांमध्ये पठाण चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि सर्वाधिक कमाई UAE मध्ये करणारा चित्रपट पठाण होऊ शकतो, असे सांगितले जात आहे.