Shah Rukh Khan | का होतोय शाहरुख खान याचा तो व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याने केले धर्माबद्दल मोठे वक्तव्य

| Updated on: Feb 27, 2023 | 9:59 PM

पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता.

Shah Rukh Khan | का होतोय शाहरुख खान याचा तो व्हिडीओ व्हायरल, अभिनेत्याने केले धर्माबद्दल मोठे वक्तव्य
Follow us on

मुंबई : शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झालाय. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. अनेकांनी तर या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. काहींनी चित्रपटाच्या विरोधात आंदोलने करण्यासही सुरूवात केली. बेशर्म रंग गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने अनेकांना अपेक्ष होता. मात्र, दुसरीकडे सुरूवातीपासूनच या चित्रपटाबद्दल शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता होती. प्रत्यक्षात चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर मोठा धमाका झाला आणि चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवले.

काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाहुबली 2 चा रेकाॅर्ड आपल्या नावावर नोंदवला आहे. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलायं. पठाण चित्रपटाला फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.

पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. यानंतर शाहरुख खान मोठ्या पडद्यापासून दूर होता.

पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात होता. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाचे काही खास प्रमोशनही केले नाही. 24 फेब्रुवारी रोजी अक्षय कुमार याचा सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय.

नुकताच सोशल मीडियावर शाहरुख खान याचा एक जुना व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान याने म्हटले आहे की, आपल्या देशात एकूण 1600 भाषा आणि डायलेक्ट्स आहेत. विशेष म्हणजे 10 ते 15 किमीच्या आतमध्ये डायलेक्ट्स बदलते. जगात किती धर्म आहेत हे मला माहीती नाही. पण मला असे वाटते की आपल्या देशाला कोणताही धर्म नाही.

पुढे शाहरुख खान म्हणताना दिसत आहे, सर्व धर्म मिळून देशाचे एक अतिशय सुंदर चित्र तयार होते. सर्व रंग एकमेकांमध्ये मिसळतात. जर तुम्ही त्यातून एक रंग काढून टाकलात किंवा एका रंगाला दुसऱ्यापेक्षा चांगला म्हणायला सुरुवात केली तर संपूर्ण चित्र खराब होईल…आता शाहरुख खान याचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. पठाण चित्रपटाचा जलवा बाॅक्स आॅफिसवर सुरू असतानाच शाहरुख खान याने त्याच्या आगामी जवान या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे.