मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आज (शनिवार, 30 ऑक्टोबर) मुंबईच्या आर्थर रोड जेलमधून बाहेर आला. आर्यन खानला 14 अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते देश सोडून जाऊ शकणार नाहीत. ड्रग्ज प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य आरोपींच्या संपर्कात राहणार नाही. दर शुक्रवारी NCB कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे.
आर्यन खानला तुरुंगातून आणण्यासाठी शाहरुख खानने त्याचा सर्वात विश्वासू अंगरक्षक पाठवला होता. रवी सिंह हा शाहरुख खानचा बॉडीगार्ड आहे. रवी सिंह नावाचा हा अंगरक्षक गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख खानसोबत आहे. पण हा रवी सिंह नेमका कोण आहे? आर्यन खान प्रकरणावर रवी सिंह वारंवार का बोलत आहेत?, असा प्रश्न शाहरुखच्या चाहत्यांना देखील पडला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन खानच्या जामीन अर्जावर एनसीबी कार्यालयात सुनावणी असो किंवा चौकशी असो, रवी सिंह या ठिकाणी वारंवार दिसत आहेत. यामुळे आज आर्यन खानला घेण्यासाठी रवी सिंग आर्थर रोड जेलमध्ये पोहोचला, तेव्हा शाहरुख खानच्या नजरेत रवी सिंह किती महत्त्वाचा आहे, याकडे लोकांचे लक्ष लागले.
रवी सिंह गेल्या दहा वर्षांपासून शाहरुख खानसोबत अंगरक्षक म्हणून आहे. शाहरुख खानचा बॉडीगार्ड असल्याने तो नेहमीच त्याच्या सावलीसारखा असतो. 13 ऑक्टोबरला शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी मुंबई सत्र न्यायालयात आली तेव्हाही रवी सिंह तिच्यासोबत होता.
शाहरुख खानचा सर्वात विश्वासू असण्याव्यतिरिक्त, रवी सिंह हा बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अंगरक्षकांपैकी एक मानला जातो. काही दिवसांपूर्वी शाहरुख खान रवी सिंहला महिन्याला 2 कोटी 7 लाख रुपये पगार देतो, अशी देखील चर्चा होती.
रवी सिंह हा शाहरुख खानचा सुरक्षा प्रमुख आहे. शाहरुखसोबतच त्याच्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारीही त्याच्यावर आहे. रवी सिंहची टीम आर्यन खान, सुहाना खान आणि अबराम खान यांच्या सुरक्षेचीही काळजी घेते. शाहरुख खानचे दररोजचे टाईम टेबल रवी सिंहसोबत असते. रवी नेहमीच शाहरुखसोबत त्याच्या सावलीसारखा उभा असतो.
2014 मध्ये रवी सिंहही अडचणीत सापडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रवी सिंहला वांद्रे पोलिसांनी पकडले होते. मात्र, काही तासांतच त्यांची सुटका करण्यात आली. एका अवॉर्ड फंक्शनला शाहरुख खानसोबत असताना रवी सिंहने शर्वरी नावाच्या एका मराठी अभिनेत्रीला फटकारले होते. व्हीआयपी पास असूनही रवी सिंहचा शर्वरीसोबत वाद झाला होता. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रवी सिंहने शर्वरीला जबरदस्तीने हटवले होते. या नंतर रवी सिंह याला समज देऊन सोडण्यात आले होते.
मंगळसूत्राची जाहिरात मोठ्या वादात, सेलिब्रिटी डिझायनर सब्यासाची नोटीस जारी!