लाखो रुपयांची गाडी सोडून मुंबईत रिक्षाने प्रवास करताना दिसली शहनाज गिल, स्पेशल व्यक्तीसोबत दिसली पंजाबची कतरिना

| Updated on: May 07, 2023 | 9:07 PM

बिग बाॅस फेम शहनाज गिल हिने काही दिवसांपूर्वीच सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जान याच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे बिग बाॅस हिच्या अभिनयाचे काैतुक देखील करण्यात आले. सध्या सोशल मीडियावर शहनाज गिल हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

लाखो रुपयांची गाडी सोडून मुंबईत रिक्षाने प्रवास करताना दिसली शहनाज गिल, स्पेशल व्यक्तीसोबत दिसली पंजाबची कतरिना
Follow us on

मुंबई : बिग बाॅस 13 मधून जर खरी ओळख कोणाला मिळाली आहे तर शहनाज गिल (Shehnaaz Gill) हिला मिळालीये. बिग बाॅसमध्ये सहभागी होण्यापूर्वी शहनाज गिल हिला फक्त पंजाबमध्ये ओळखले जायचे. मात्र, बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर संपूर्ण देशभरात एक खास ओळख निर्माण करण्यात शहनाज गिल हिला यश मिळाले. बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात असताना शहनाज गिल ही धमाकेदार गेम खेळताना दिसली. शहनाज गिल आणि सिध्दार्थ शुक्ला यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. सिध्दार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाज गिल ही तुटलेली दिसली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सतत शहनाज गिल हिच्या फॅन फाॅलोइंगमध्ये (Fan following) मोठी वाढ होताना दिसत आहे.

शहनाज गिल हिने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पदार्पण देखील केले आहे. शहनाज गिल ही सलमान खान याचा चित्रपट किसी का भाई किसी की जानमध्ये धमाका करताना दिसली. या चित्रपटातूनच शहनाज गिल ही बाॅलिवूडमध्ये डेब्यू केलाय. विशेष म्हणजे शहनाज गिल हिच्या अभिनयाचे काैतुक देखील केले गेले.

सध्या सोशल मीडियावर शहनाज गिल हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. शहनाज गिल हिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिचे काैतुक केले आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शहनाज गिल ही मुंबईमध्ये तिच्या आईसोबत चक्क रिक्षाने फिरताना दिसली आहे. शहनाज गिल हिला असे रिक्षाने फिरताना पाहून चाहते देखील हैराण झाले आहेत.

शहनाज गिल हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, लाखोंची गाडी सोडून शहनाज गिल ही रिक्षाने प्रवास करत आहे…मानले आज मी शहनाज हिला. दुसऱ्याने लिहिले की, लोकांनी शहनाज गिल हिच्याकडून शिकले पाहिजे…व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये शहनाज गिल हिने काळ्या रंगाचे कपडे घातल्याचे दिसत आहे. आता शहनाज गिल हिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.

21 एप्रिल रोजी शहनाज गिल हिचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झालाय. मात्र, सलमान खान याच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका बाॅक्स आॅफिसवर करण्यात यश मिळाले नाही. फक्त शहनाज गिल हिच नाही तर श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी हिने देखील किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.