बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची फक्त देशच नाही तर जगभरात क्रेज आहे. जगभरात शाहरुख खानचे चाहते आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा उद्या 2 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्यामुळे शाहरुख खानशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायची आहे. शाहरुख खानच्या आयुष्यातील विविध अनुभव प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहेत. चाहत्यांचं सर्वाधिक प्रेम हे शाहरुख खानवर आहे. पण शाहरुख खानला त्याचं सर्वाधिक प्रेम कुणावर आहे? असा प्रश्न विचारला तर तो सर्वसामान्य व्यक्ती प्रमाणे आपली पत्नी गौरी आणि मुलांचं नाव घेईल. अर्थात ते साहजिकच आहे. शाहरुख खान याच्या वाढदिवसासह सध्या दिवाळीचा देखील उत्साह आहे. शाहरुख दरवर्षी आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरा करतो. तो आपल्या कुटुंबासह दिवाळी कसा साजरा करतो? ते देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
शाहरुख खान हा मुस्लिम घराण्यातून येतो, तर त्याची पत्नी गौरी छिब्बर ही हिंदू परिवारातून आली आहे. दोघांच्या लग्नाला आता बरीच वर्षेदेखील झाले आहेत. पण लग्नाला इतके वर्षे झाली तरी त्यांच्यातील प्रेम तितकेच घट्ट आहे. तसेच ते द्विगुणितदेखील झाले आहे. त्यांनी एक मुलगी आणि दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव सुहाना आणि मुलांचं नाव अबराम आणि आर्यन असं आहे. शाहरुख आपल्या कुटुंबासमवेत दिवाळी कसा साजरी करतो? याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.
या व्हिडीओत शाहरुख आपल्या मुलांना आपण दिवाळी, ईद आणि ख्रिसमस साजरी करण्यात कसा आनंद मिळतो आणि ते सेलिब्रेशन कसं करावं हे शिकवल्याचं सांगताना दिसतोय. “आम्ही सर्व सण खूप आनंदाने कुटुंबासह साजरी करतो आणि माझे मुलंदेखील सर्व सण इन्जॉय करतात”, असं शाहरुख खान व्हिडीओत म्हणताना दिसतोय.
संबंधित व्हिडीओ खरंतर बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीची एक छोटीसी क्लिप आहे. या क्लिपमध्ये शाहरुख आपल्या मुलांना दिवाळी आणि देवाबद्दल समजावताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ हा 2004 चा शाहरुख खान आणि गौरीच्या घरातील दिवाळी पार्टीचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि गौरी आपल्या मुलांना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात धर्माचं महत्त्व काय आहे, हे समजावताना दिसत आहेत. तसेच अनेक मुलांचे पालक हे वेगवेगळ्या कल्चरमधून येतात मग त्यांची देवाबाबतची भावना काय असावी, हे देखील शाहरुख आणि गौरी आपल्या मुलांना समजावताना दिसत आहेत. संबंधित व्हिडीओ हा शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यामधील आहे. या व्हिडीओत शाहरुख आणि गौरी आपल्या मुलांना दिवाळीच्या पूजेबाबत समजावत आहेत. त्याचबरोबर शाहरुख कुरानमधील गोष्टी देखील आपल्या मुलांना समजावताना दिसत आहेत.
शाहरुख खान व्हिडीओत सांगतो की, त्याच्या घरात मुलांना दोन्ही धर्माबद्दल माहिती दिली जाते आणि समजावली जाते. “आमच्या मुलांना हे समजायला हवं की, देवाचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे, मग हिंदू देव असो किंवा मुसलमान, त्यामुळे घरात आम्ही गणपती बाप्पा, लक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या बाजूला आम्ही पवित्र कुराणदेखील ठेवलं आहे. आम्ही मुलांसोबत एकत्र गायत्री मंत्र म्हणतो तसेच माझा मुलगा माझ्यासोबत ‘बिस्मिल्लाह’ म्हणतो. मला आनंद आहे की, मी माझ्या मुलांना हे शिकवू शकतो ज्याबाबत मलाही जास्त माहिती नाही. खरंतर मी धार्मिक व्यक्ती नाही. पण माझा अल्लाहवर खूप विश्वास आहे. माझ्या आई-वडिलांनी मला कधीच दिवसातून पाच वेळेस नमाज पठण करण्यासाठी आग्रह केला नाही”, असंदेखील शाहरूख आपल्या व्हिडीओत सांगताना दिसतोय.