मुंबई : रणबीर कपूरचा ‘शमशेरा’ (Shamshera) हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटांपैकी एक होता. मात्र, या चित्रपटाची जेवढी चर्चा झाली, तेवढी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाला समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि प्रेक्षकांनीही चित्रपटाला प्रेम दिले नाही. 22 जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फ्लॉप ठरला. यामुळेच दिग्दर्शक करण मल्होत्रा (Karan Malhotra) भावूक झाल्याचे दिसले. चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर करण मल्होत्राने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नोट शेअर केलीयं.
Shamshera is mine! #Shamshera #Shamsheraismine pic.twitter.com/MZyCfaeHFB
हे सुद्धा वाचा— Karan Malhotra (@karanmalhotra21) July 27, 2022
चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर दिग्दर्शक करणने एक नोट शेअर केली आहे. करण यांनी लिहिले आहे की, माझ्या प्रिय शमशेरा, तू तुझ्यासारखाच भव्य आहेस. या व्यासपीठावर व्यक्त होणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे, कारण इथेच तुमच्यासाठी प्रेम, द्वेष, उत्सव आणि अपमान आहे. गेल्या काही दिवसांपासून मला ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्याबद्दल मला माफी मागायची आहे, कारण मी द्वेष आणि राग सहन करू शकत नाही. माझे परत येणे ही माझी कमजोरी होती. यासाठी कोणतेही निमित्त नाही, परंतु आता मी तुमच्याबरोबर आहे. तुम्ही माझे आहात याचा मला तुमच्या पाठीशी उभा राहण्याचा अभिमान आणि सन्मान वाटतो. आम्ही सर्व गोष्टींना एकत्र तोंड देऊ, मग ते चांगले असो वा वाईट.
This is the attitude of Bollywood. They never say sorry to public for making a ghatiya film. They always say that their film is masterpiece. But ppl are idiots who didn’t like the film.
Arey Bhai Sahab Ab Toh Maanlo Ki your film is more dangerous than #Corona! https://t.co/1y9qKwH7t9— KRK (@kamaalrkhan) July 27, 2022
करण मल्होत्राने ही नोट शेअर केल्यानंतर काही वेळाने कमाल रशीद खान म्हणजेच केआरकेने यांनी टिंगल उडवल्याचे दिसते आहे. एका ट्विटमध्ये केआरके यांनी लिहिले की, हे बॉलीवूडचे वागणे आहे. खराब चित्रपट बनवल्याबद्दल ते कधीही माफी मागत नाहीत. त्याचा चित्रपट हा चांगला असल्याचे ते नेहमी म्हणतात. लोकच मूर्ख आहेत, ज्यांना त्यांचा चित्रपट आवडला नाही, अरे भाऊ, आता विश्वास ठेवा, तुमचा चित्रपट कोरोनापेक्षाही खतरनाक आहे. शमशेरा चित्रपटाने सहा दिवसांत सुमारे 39 कोटींचा व्यवसाय केला आहे.