Kangana Ranaut | कंगना राणावत हिने थेट ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाला म्हटले पागल, वाचा नेमके प्रकरण काय?

| Updated on: Apr 30, 2023 | 3:35 PM

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही कायमच वादामध्ये अडकते. कंगना राणावत आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळत आहे. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बाॅलिवूडमधील काही चित्रपट निर्माते आणि कलाकार असतात.

Kangana Ranaut | कंगना राणावत हिने थेट या प्रसिद्ध दिग्दर्शकाला म्हटले पागल, वाचा नेमके प्रकरण काय?
Follow us on

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे आज बाॅलिवूडमध्ये काम करून कंगना राणावत हिला तब्बल 17 वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, एक फोटो शेअर करत कंगना राणावत हिने थेट एका चित्रपट (Movie) दिग्दर्शकाला पागल म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून कंगना राणावत ही सतत वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. विषय कोणत्याही असो कंगना आपले मत मांडताना अजिबात विचार करत नाही आणि ती वादात अडकते. बऱ्याच वेळा कंगना राणावत हिला टिकेचा सामना देखील करावा लागतो. कंगना राणावत हिच्या निशाण्यावर बरेच चित्रपट निर्माता आणि बाॅलिवूड (Bollywood) कलाकार असतात.

काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा हिने बाॅलिवूडवर गंभीर आरोप केले होते. प्रियांका चोप्रा हिचे आरोप ऐकून कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत प्रियांका चोप्रा हिचा सपोर्ट करत थेट करण जोहर याला खडेबोल सुनावले होते. कायमच कंगना ही करण जोहर याला टार्गेट करताना दिसते. कंगना राणावत आणि करण जोहर यांच्यामधील वाद जवळपास सर्वांनाच माहिती आहे.

नुकताच कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत एक फोटोही शेअर केला आहे. कंगना राणावत हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती आणि अनुराग बसु हे दिसत आहेत. कंगना राणावत हिला बाॅलिवूडमध्ये चित्रपटात पहिल्यांदा काम करण्याची संधी ही अनुराग बसु यांनीच दिलीये. त्यांच्या चित्रपटात कंगनाने महत्वाची भूमिका केली होती.

28 एप्रिल 2006 रोजी अनुराग बसुने कंगना राणावत हिला लाॅन्च केले. आतापर्यंतच्या 17 वर्षांमध्ये कंगना राणावत हिने अनेक बाॅलिवूड चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, अनुराग बसु यांच्यासोबतचा हा फोटो शेअर करताना कंगना राणावत हिने थेट पागल म्हटले आहे. आता कंगना राणावत हिची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

कंगना राणावत हा फोटो शेअर करत म्हणाली  त्यांनी सांगितले होते की, अभिनेत्रीची पाच ते सहा वर्ष लाईफ सेल्फ असते…परंतू आतातर 17 वर्ष झाली आहेत. शाहरूख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करत असताना कंगना राणावत हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, या देशात खान लोकांचे चित्रपट प्रेक्षकांना अधिक आवडतात. यानंतर अनेकांनी कंगनावर टिका देखील केली होती.