The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांचे वादग्रस्त विधान, थेट म्हणाले, निवडणुकीच्या वेळी धर्मांतराचा…

| Updated on: May 11, 2023 | 3:04 PM

द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत वादामध्ये अडकलाय. मुळात म्हणजे द केरळ स्टोरी चित्रपटाचे टिझर रिलीज झाल्यापासूनच मोठा वाद बघायला मिळतोय. सतत चित्रपटाला विरोध केला जात आहे. दुसरीकडे चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना दिसत आहे.

The Kerala Story | द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांचे वादग्रस्त विधान, थेट म्हणाले, निवडणुकीच्या वेळी धर्मांतराचा...
Follow us on

मुंबई : द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात अडकलाय. द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाले आहेत. मात्र, असे असताना देखील वाद कमी होत नाहीये. अनेक राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आलीये, तर दोन राज्यांमध्ये चित्रपट (Movie) टॅक्स फ्री करण्यात आला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्यात चित्रपटावर बंदी घातली गेलीये. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) चित्रपटावर बंदी घालण्यात आल्यानंतर मोठा वाद निर्मात झाला. थेट पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्यांनी थेट कोर्टात धाव घेतलीये. आता हा वाद वाढताना दिसतोय.

बाॅलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाचे काैतुक करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. विवेक अग्निहोत्री यांनी देखील चित्रपटाचा सपोर्ट केला आहे. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, द कश्मीर फाईल्स चित्रपटाला विरोध करणारे आणि द केरळ स्टोरी चित्रपटाला विरोध करणारे एकच आहेत.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आता शत्रुघ्न सिन्हा यांनी द केरळ स्टोरी या चित्रपटाबद्दल मोठे विधान केले आहे. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, मी सर्वात अगोदर हे स्पष्ट करू इच्छितो की मी अजूनही द केरळ स्टोरी हा चित्रपट बघितला नाहीये. कारण मी सध्या प्रवासामध्ये इतका जास्त बिझी आहे की मी सोनाक्षी सिन्हा हिची वेब सीरिजही बघितली नाही.

पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, माझा असा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला त्याचे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु कोणत्याही राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या किंमतेवर नक्कीच नाही. एखाद्या चित्रपटामुळे राज्यातील शांततेला धोका निर्माण होत असेल तर त्या स्वातंत्र्यावर बंदी घालावी. अभिव्यक्तीचा अधिकार आहे तसा प्रशासनाचाही अधिकार देखील आहे.

ममता बनर्जी एक अशा नेत्या आहेत, ज्या पुढच्या गोष्टींचा कायमच गांर्भियाने विचार करतात. जर ममता बनर्जी यांना वाटत असेल की, द केरळ स्टोरी चित्रपटामुळे राज्यात सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते तर त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असेल आणि त्याची कारणी त्यांच्याकडे असावीत. पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, ज्यावेळी निवडणूका असतात, त्याच वेळी द कश्मीर फाईल्स आणि द केरळ फाईल्ससारखे चित्रपट का रिलीज होतात?