मुंबई : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा ‘शेरशाह‘ (Shershaah) हा चित्रपट रिलीज झाल्यापासून तो प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत असतानाच या चित्रपटाची गाणीही प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहेत. यावर्षी 2021 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पाहिलं जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुवर्धन सुरुवातीपासूनच त्यांच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते. या चित्रपटातील सिद्धार्थ – कियारासह संपूर्ण टीमला किती फी मिळाली ते आता जाणून घेऊया.
सिद्धार्थला 7 कोटी तर कियाराची फी 4 कोटी
बॉलिवूड लाईफमधील एका रिपोर्टनुसार, ‘शेर शाह’च्या स्टारकास्टला चित्रपटासाठी भरमसाठ फी देण्यात आली आहे. विक्रम बत्राचं पात्र साकारण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्राला सात कोटी रुपये देण्यात आले आहेत. कियारा अडवाणीला 4 कोटी रुपये देण्यात आले आहेत. दुसरीकडे, अजय सिंह राठोडची भूमिका साकारणाऱ्या निकेतन धीरला 35 लाख रुपये मिळाले आहेत. तर या चित्रपटात जीएल बत्राच्या भूमिकेत दिसलेल्या पवन कल्याणला 50 लाख रुपये मिळाले आहेत. प्रेक्षक सतत चित्रपटाला आपलं प्रेम देत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटावर अनेक मोठ्या देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानसह इतर अनेक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
नुकतंच, सिद्धार्थ मल्होत्रानं एका विशेष सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं होतं की या चित्रपटानं त्याला सातव्या स्वर्गात नेलं आहे. हा चित्रपट IMDB वर सर्वाधिक रेटेड हिंदी चित्रपट बनला आहे, या चित्रपटाला IMDB वर 8.8 रेटिंग मिळाली आहे, जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहे.
चित्रपटाची कथा चांगली आहे, यासोबतच प्रेक्षकांना या चित्रपटातील सिद्धार्थ आणि कियाराची केमिस्ट्रीही आवडली आहे. ज्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट अधिक आवडत आहे. चित्रपटाची टीम आता या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सिद्धार्थ आणि कियाराची जोडी पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Monalisa : फूलं, पाणी, खानाखजाना… नवऱ्यासोबत मोनालिसाची मालदीवमध्ये दे धम्माल