मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. अनेकदा शिल्पा शेट्टी ही आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शेअर करते. मात्र, शिल्पा शेट्टी हिचे जास्त करून डाएट आणि व्यायामाचेच व्हिडीओ असतात. शिल्पा शेट्टी ही लवकरच रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या चित्रपटात धमाल करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी ही बिग बाॅसमध्ये (Bigg Boss) सहभागी झाली होती. शिल्पा शेट्टी ही शमिता हिला सपोर्ट करताना देखील दिसली.
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या फेस मास्कमध्ये फिरताना दिसतो. इतकेच नाही तर राज कुंद्रा हा अनेक पार्ट्यांमध्येही फेस मास्क लावूनच जातो. शिल्पा शेट्टी हिच्यासोबत देखील अनेकदा राज कुंद्रा हा फेस मास्क लावूनच स्पाॅट होतो. अनेकदा राज कुंद्रा हा त्याच्या फेस मास्कमुळे लोकांच्या निशाण्यावर येतो.
सध्या सोशल मीडियावर शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा हे गाडीमधून उतरताना दिसत आहेत. अगोदर गाडीमधून राज कुंद्रा हा उतरतो आणि मग शिल्पा शेट्टी. मात्र, यावेळी राज कुंद्रा याचे फेस मास्क पाहून अनेकांना मोठा धक्का बसला.
राज कुंद्रा याने घातलेले फेस मास्क पूर्ण चमकत आहे. काळ्या रंगाचे फेस मास्क हे राज कुंद्रा याने घातले आहे. मात्र, आता राज कुंद्रा याला त्याच्या या मास्कमुळे सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केले जात आहे. याचा व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय. एकाने तर थेट लिहिले की, ही शिल्पा शेट्टी असे मास्क घालून याला सोबत का येऊ देत असेल ?
या व्हिडीओवर कमेंट करत दुसऱ्याने लिहिले की, विचार करा याने किती जास्त चुकीची कामे केली आहे की तो कोणाला आपला चेहरा देखील दाखवू शकत नाही. तिसऱ्याने लिहिले की, चुकीचे काम करून स्वत: चा चेहरा काळा करून फिरतोय हा माणूस. राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर राज कुंद्रा याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील करण्यात आले.