मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राज कुंद्रा आणि अभिनेत्री शर्लिन चोप्रा यांच्यामध्ये सोशल मीडियावर वार सुरू आहे. मात्र, हे प्रकरण आता पोलिस ठाण्यात देखील गेले. राज कुंद्राने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शर्लिन चोप्रा समाजासाठी धोका असल्याचे म्हटले होते. आता यावर शर्लिन चोप्राने देखील जोरदार प्रतिउत्तर दिलंय. साजिद खान बिग बाॅसमध्ये दाखल झाल्यापासून या वादाला खरे तर तोंड फुटले आहे.
Dogs LOVE to bark and some love to finger! Doesn’t take rocket science to google these words and many links will pop up exposing the barking dog. @MahaCyber1 has been informed they have date and time stamps to expose the lying female dog! ??
— Raj Kundra (@TheRajKundra) November 5, 2022
साजिद खानच्या समर्थनार्थ मैदानात उतरलेल्या राखी सावंत विरोधात देखील शर्लिन चोप्राने FIR दाखल केलीये. आता शर्लिनच्या निशाण्यावर शिल्पाचा पती राज कुंद्रा हा आहे. गेल्या वर्षी शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. सोशल मीडियावर सुरू असलेल्या वारनंतर शर्लिनने आपल्या कायदेशीर टीमला राज कुंद्रा विरोधात आयपीसी 156 (3) नुसार गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे हे नक्की आहे की, राज कुंद्राच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होणार.
शर्लिनने सांगितले होते की, तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीसाठी काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो बनवले आहेत. मात्र, त्यांनी तिला काहीच पैसे दिले नाहीत. शर्लिनने जुहू पोलिस स्टेशनमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला आहे. राज कुंद्राने शर्लिन चोप्रा विरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले होते की, ही महिल्यांच्या अधिकारावर बोलत आहे पण ही खाण असून हिला लवकरच अटक होणार आहे.