मुंबई : मॉडेल-अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) आज आपला 41 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. शिबानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती बॉयफ्रेंड फरहान अख्तरसोबत (Farhan Akhtar) फोटो शेअर करत असते. यावेळी शिबानीनं फरहानला त्याच्या वाढदिवशी खास भेट दिली आहे. शिबानीच्या या भेटवस्तूनं सर्वांचं मन जिंकलं आहे.
शिबानीनं तिच्या वाढदिवशी फरहानच्या नावाचा टॅटू काढला आहे. तिनं तिच्या गळ्यावर हा टॅटू बनवला आहे. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. फोटोमध्ये शिबानी तिचा टॅटू फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
शिबानीनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर टॅटूचा फोटो शेअर केला आहे. फोटो बघून असं वाटतं की शिबानीनं आताच हा टॅटू बनवला आहे. फोटोमध्ये तिची मान लाल दिसत आहे.
फरहानने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
शिबानीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं फरहाननं तिच्यासाठी एक अतिशय गोंडस पोस्ट शेअर केली आहे. त्यानं शिबानीसोबत एक जुना ब्लॅक आणि व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं – माझ्या मनापासून…. वाढदिवसाच्या शुभेच्छा… तुझ्यावर प्रेम करतो …
फरहान अख्तरच्या पोस्टवर कमेंट करून अनेक सेलेब्सनी शिबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हृतिक रोशननं कमेंट केली- शिबानीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
शिबानी आणि फरहान गेल्या 3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. फरहानचे यापूर्वी हेअरस्टाइलिस्ट अधुना भबानीशी लग्न झालं होतं आणि त्याला दोन मुली आहेत.
फरहानसोबत लग्नाबाबत झाली चर्चा
काही काळापूर्वी शिबानी फरहान अख्तरसोबत लग्न करणार असल्याबद्दल बोलली. तिनं सांगितलं होतं की या कोरोनामध्ये ते दोघं एका कपलसारखे जगले. बॉलिवूड बबल्ससोबतच्या मुलाखतीत ती म्हणाले की, प्रत्येकजण मला लग्नाचा प्रश्न विचारत आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर, आम्ही अद्याप या विषयाबद्दल विचार केला नाही, परंतु मी लोकांना सांगितलं आहे की आम्ही याबद्दल बोलू आणि जर असं काही घडलं तर मी सर्वांना सांगेन. आम्ही अजून लग्न करत नाही आहोत.
संबंधित बातम्या
Sonu Sood Delhi: ‘देश के मेंटर’चा सोनू सूद ब्रँड अॅम्बेसेडर; दिल्ली सरकारकडून नव्या उपक्रमाची घोषणा