मुंबई : एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाने एक मोठा इतिहास रचला आहे. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कार (Oscars Awards 2023) जिंकला आहे. ही एक प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत आभिमानाची गोष्ट नक्कीच आहे. या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्ग कॅटेगिरीतून हा पुरस्कार मिळालाय. नाटू नाटू गाण्याला इतका मोठा पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड आनंद दिसतोय. सर्वत्र आरआरआर (RRR) टिमची काैतुक केले जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, आता पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला आरआरआरची टीम उपस्थित होती आणि नाटू नाटू गाण्याची घोषणा होताच सर्वांनी मोठा जल्लोष केला. मात्र, यादरम्यान एक मोठा प्रकार घडला आहे, आता त्यावरून मोठा गोंधळ निर्माण झालाय. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीये. आरआरआर चित्रपटाचे नाव घेताना पुरस्कार सोहळ्यातील होस्टने एक मोठी चूक केलीये.
Dear #Oscars95 Team, #RRR is not a #Bollywood movie. Please note. ?
— Shiva’Marvel’Nandy (@shivanandysky) March 13, 2023
ऑस्कर पुरस्काराचे सूत्रसंचालन करताना जिमी किमेल दिसले, यांच्याकडून ही मोठी चुक झालीये. जिमी किमेल यांनी एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाला थेट बाॅलिवूड चित्रपट म्हटले. यामुळेच मोठा संताप व्यक्त केला, जातोय. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. आरआरआर चित्रपटाला बाॅलिवूडचा चित्रपट म्हणणे चाहत्यांना अजिबातच पटलेले दिसत नाही.
एका युजर्सने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, हे अत्यंत चुकीचे आहे. आरआरआर हा एक भारतीय, तेलुगू आणि तमिल चित्रपट आहे. दुसऱ्याने लिहिले की, डिअर ऑस्कर टिम….आरआरआर हा बाॅलिवूड चित्रपट नाहीये….हे कायमच लक्षात असून द्या किंवा तुम्ही लिहूनच घ्या. तिसऱ्याने लिहिले की, आरआरआर हा चित्रपट बाॅलिवूड नसून टॉलिवूड चित्रपट आहे. अनेकांनी या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय.
Ooh… #Oscars just love controversies and conflicts. Referring to #RRR as a Bollywood film even after hearing that the creators are promoting it as an Indian film for months.
— उज्जल | UJJAL (@beujjal) March 13, 2023
एकीकडे आरआरआर चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाल्याने चाहत्यांमध्ये आनंद आहे तर दुसरीकडे आरआरआर चित्रपटाला बाॅलिवूड चित्रपट म्हटल्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. अनेकांनी हे मुद्दाम केल्याचे देखील म्हटले आहे. टाॅलिवूडचे नाव दाबण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचा अत्यंत मोठा आरोप देखील करण्यात आलाय. आरआरआर चित्रपटाची हवा पुरस्कारामध्ये बघायला मिळाली आहे. आता सर्वचजण हे आरआरआर चित्रपटाच्या टिमचे काैतुक करताना दिसत आहेत.