मुंबई : टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सतत बातम्या येत होत्या की, शुभमन आणि श्रद्धा कपूर एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, अचानकच श्रद्धा कपूरचा पता कट झाला आणि सारा अली खान (Sara Ali Khan) आणि शुभमनच्या नावाची चर्चा सुरू झाली. श्रद्धानंतर आता शुभमन सारा अली खानला डेट करतोय, अशी माहिती मिळतंय. इतकेच नाही तर आॅगस्ट महिन्यातील शुभमन आणि साराचे लंडनमधील काही फोटो सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल झाले होते.
Sara Ali Khan and shubman gill spotted at airport together ?pic.twitter.com/Ylv7NAQjc8
— Troll Cricket (@TrollCrickett) October 14, 2022
सर्वत्र एक चर्चा आहे की, शुभमन आणि सारा डेट करत आहेत, मात्र अजूनही सारा किंवा शुभमनने त्यांच्या नात्यावर काही भाष्य केले नाहीये. नुकताच सारा अली खान आणि शुभमन गिलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ विमानतळावरील असल्याचे दिसतंय. या व्हिडीओमध्ये शुभमन बॅग घेताना दिसत आहे. तर सारा अली खान विमानामध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे शुभमन आणि साराचा हा व्हिडीओ करवा चौथच्या दिवशीचा असल्याचे सांगण्यात येतंय.
व्हिडीओमध्ये हेही दिसत आहे की, सारा आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढते आहे. शुभमन बॅग घेत असताना सारा शुभमनच्या बाजूने फास्ट निघून जाताना देखील दिसत आहे. केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी देखील गेल्या अनेक दिवसांपासून डेट करत आहेत. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, अथिया आणि केएल राहुल लवकरच लग्नबंधणात अडकणार आहेत. सारा अली खान आणि शुभमन गिलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय.